Vastu Tips, Symbol In Home know About Swastik Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार शुभ कार्यात स्वस्तिक बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा, अनेक संकटांपासून होईल सुटका

Symbol In Home know About Swastik : हिंदू धर्मात पूजेच्या वेळी स्वस्तिक चिन्ह बनवणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, यामुळे घरात सुख, समृद्धी येते. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभप्रतिक मानले जाते.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Swastik :

हिंदू धर्मात पूजेच्या वेळी स्वस्तिक चिन्ह बनवणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, यामुळे घरात सुख, समृद्धी येते. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभप्रतिक मानले जाते.

स्वस्तिकचा अर्थ कल्याण असो असा आहे. यामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रम्हदेव, शिवपार्वती,श्रीगणेश अशा अनेक देवतांचा यामध्ये समावेश आहे. पूजा आणि शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक बनवण्याचा नियम (rules) प्राचीन काळापासून सुरु आहे.

स्वस्तिक हे आद्य पूज्य देवता श्रीगणेशाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शुभ कार्याच्या सुरुवातीला स्वस्तिक काढले जाते. स्वस्तिकला आठ हात आहे. तसेच चार मुख्य हात हे चार वेद, चार दिशा आणि चार प्रयत्नांचे (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष)प्रतिक मानले जाते.

वास्तुनुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारण्यासाठी स्वस्तिक बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जाणून घेऊया खास वास्तु टीप्स (Vastu Tips)

  • घर (Home) किंवा ऑफिसमध्ये पूर्व, ईशान्य आणि उत्तर दिशेला स्वस्तिक बनवावे.

  • घरामध्ये अष्टधातू किंवा तांब्याचे स्वस्तिक स्थापन केल्याने शुभ मानले जाते.

  • मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत स्वस्तिक ठेवत असाल तर नैऋत्य दिशेला ठेवा.

  • जर घराच्या अंगणात स्वस्तिक काढत असाल तर सिंदूरचा वापर करा.

  • वास्तुनुसार स्वस्तिकच्या जवळपास घाण, बूट आणि चप्पल काढू नका.

  • वास्तुदोष दूर करण्यासाठी नऊ बोटे लांब आणि रुंद स्वस्तिक बनवावे.

  • घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावू शकता.

  • असे म्हटले जाते की, घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी स्वस्तिक काढल्याने धनात वाढ होते.

  • घराच्या अंगणात मधोमध स्वस्तिक बनवल्याने नकारात्मकता दूर होते असे म्हटले जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमित शहांनी घेतलं लालबाग राजाचं दर्शन

मोठी बातमी! आता बंडखोर खासदारांच्या गटातच फूट? 17 जणांनी निवडला वेगळा मार्ग

EPFO Update : पगारातून PF कापलं जातं, पण अकाउंटमध्ये पैसे जात नाही? सर्वात आधी ही एक गोष्ट करा!

बिल्डर घराचं पझेशन देण्यास टाळाटाळ करतोय? RERAचा नियम जाणून घ्या; व्याजासह मिळणार संपूर्ण पैसा परत

Celebrity Ganpati: सुबोध भावे ते सोनाली कुलकर्णी; मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचं थाटात स्वागत

SCROLL FOR NEXT