Vastu Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : घरातल्या या ठिकाणी चुकूनही ठेवू नका घड्याळ, सतत भासेल पैशांची चणचण

Vastu Tips For Positive Energy : वास्तुशास्त्रानुसार घरातील दिशा ही प्रत्येक वस्तूसाठी महत्त्वाची ठरली जाते. त्यामुळे घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा समावेश होतो.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home :

वास्तुशास्त्रानुसार घरातील दिशा ही अधिक महत्त्वाची असते. ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घरातील दिशा ही प्रत्येक वस्तूसाठी महत्त्वाची ठरली जाते. त्यामुळे घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा समावेश होतो.

वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) मनगटावर घातलेल्या घड्याळाबद्दल जाणून घेणार आहोत. लोक झोपताना हातात घातलेले घड्याळ उशीखाली ठेवतात. पण वास्तूशास्त्रानुसार उशी खाली घड्याळ ठेवून झोपू नये. त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींचा आपल्या मेंदू आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच या लहरींमुळे आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. ज्यामुळे घरातील वातावरण बिघडते. तणाव (Stress) निर्माण होतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वास्तूशास्त्रानुसार घराची (Home) प्रगती होत नसेल, आर्थिक यश मिळत नसेल तर घराची आर्थिस स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला काही टीप्स फॉलो कराव्या लागतील. तसेच घरातील वास्तूदोषही घड्याळाच्या माध्यमातून दूर करु शकता. (Vastu Tips In Marathi)

वास्तूशास्त्रानुसार घड्याळ गोल, चौकोनी, अंडाकृती किंवा आठ आणि सहा बाजूंनी लावावे. यामुळे घरात सकारात्मकता येते. त्यामुळे घड्याळ खरेदी करताना घड्याळाच्या आकाराकडे पूर्ण लक्ष द्या. घराच्या भिंतीवर लोलकाचे घड्याळ लावणे फायदेशीर ठरते. भिंतीवर पेंडुलम लावल्याने वेळ चांगला राहातो. तसेच जीवनातील अनेक संकटे दूर होतात. वास्तूशास्त्रानुसार घड्याळ चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT