Vastu Tips Saam TV
लाईफस्टाईल

Vastu Tips : देव्हाऱ्यातून आजच 'या' गोष्टी काढून टाका; अन्यथा घरात नकारात्मकता वाढेल

Temple Vastu Tips : हिंदू धर्मात देवी देवतांची प्रतिमा, फोटो, मुर्ती देव्हाऱ्यात ठेवले जाते. तसेच दररोज त्यांची पूजा केली जाते. असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असा काहींचा समज आहे.

Ruchika Jadhav

हिंदू धर्मात प्रत्येक घरात एक देव्हारा असतो. गावासारख्या ठिकाणी अगदी एक मोठी खोली देवासाठी असते. या खोलीला देवघर सुद्धा म्हणतात. हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत. त्या सर्वांची प्रतिमा, फोटो, मुर्ती देव्हाऱ्यात ठेवले जाते. तसेच दररोज त्यांची पूजा केली जाते. असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते अशी काहींची श्रद्धा आहे.

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमाला आपण एकमेकांना गिफ्ट्स देतो. अशात काहीवेळा आपल्याकडे देवाची मुर्ती किंवा फोटो फ्रेम मिळते. या सर्व वस्तू देखील आपण देव्हाऱ्यात ठेवतो. मात्र काहीवेळा चुकीच्या गोष्टी देव्हाऱ्यात गेल्यास घरातील व्यक्तींवर त्याचा नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो.

मंदिरात, देव्हाऱ्यात या वस्तू ठेवू नका

देव्हाऱ्यात कधीही चुकून क्रोध, राग असा चेहरा असलेली मुर्ती ठेवू नका. तसेच तुटलेल्या मुर्त्या देखील देव्हारात ठेवू नका. त्याने घरामध्ये आर्थिक चणचण निर्माण होते. होणारे काम पूर्ण होत नाही, अर्धवट राहते.

देव्हाऱ्यात कैची किंवा अन्य टोकदार आणि धारदार वस्तू ठेवू नका. काही महिला घरामध्ये सुया आणि कैची देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या ड्रॉव्हरमध्ये ठेवतात. मात्र तसे केल्याने घरामध्ये नकारात्मक उर्जा पसरत जाते.

आपल्या देवांची दररोज पूजा करावी. देवाला दररोज नवीन ताजे फुल वाहावे. काही व्यक्ती फुलं सुकलेली असली तरी देवाजवळ ठेवतात. तर काही व्यक्ती नकली फुलांची माळ देवाजवळ ठेवतात. असे केल्याने त्या घरातील व्यक्तींचे आरोग्य खराब होते.

वास्तूशास्त्रानुसार, देव्हाऱ्याजवळ किंवा त्या खोलीत घरातील वारलेल्या व्यक्तींचे, पूर्वजांचे फोटो कधीच लावू नका. त्यामुळे घरातील अन्य व्यक्तींना विविध भास होऊ शकतात.

टीप : वास्तूशास्त्रानुसार घेतलेलील ही सामान्य माहिती आहे. देवी, देवता यांच्याबाबत साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरेंचा १९ ऑक्टोबर रोजी मेळावा

Diwali Shopping In Thane: ठाण्यातील या 5 ठिकाणी करा दिवाळी शॉपिंग, स्वस्तात मस्त होईल खरेदी

Sambhajinagar Crime : क्षुल्लक कारणातून तरुणाची हत्या; पाच जणांना घेतले ताब्यात

Kolhapur: कोल्हापुरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटी; पाहा VIDEO

Whatsapp Chat: व्हॉट्सअ‍ॅपवर चुकूनही हे मेसेज किंवा व्हिडिओ पाठवू नका, होऊ शकतो तुरुंगवास

SCROLL FOR NEXT