मी शरद पवारांना मोजत नाही, तुम्ही त्यांना देव्हाऱ्यात पूजत बसा; पडळकरांचा घणाघात

शरद पवार हे राष्ट्रवादीसाठी मोठे नेते असतील, मी त्यांना मोठं मानत नाही असा टोलाही पडळकरांनी लगावला. माझ्या गाडीवर दगड टाकणे ही कोणती लोकशाही आहे असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मी शरद पवारांना मोजत नाही, तुम्ही त्यांना देव्हाऱ्यात पूजत बसा; पडळकरांचा घणाघात
मी शरद पवारांना मोजत नाही, तुम्ही त्यांना देव्हाऱ्यात पूजत बसा; पडळकरांचा घणाघात SaamTv

लक्ष्मण सोळुंके

जालना : माझ्या वाहनावर हल्ला करणारा व्यक्ती हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून त्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फोटो आहेत. त्यामुळे माझ्यावर हल्ला कुणी केला हे आता महाराष्ट्राला कळून चुकलं आहे असं मत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं. ते जालन्यात बोलत होते. मी जे मुद्दे मांडतो त्यावर बोला असं जाहीर आव्हान देखील पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलंय. I do not count Sharad Pawar, you worship him in the temple - Padalkar

हे देखील पहा -

शरद पवार हे राष्ट्रवादीसाठी मोठे नेते असतील, मी त्यांना मोठं मानत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. माझ्या गाडीवर दगड टाकणे ही कोणती लोकशाही आहे असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. ही लोकशाही शरद पवारांना अभिप्रेत आहे का? असं विचारत राष्ट्रवादी वाल्यांनी मला काहीही शिव्या दिल्या तरी मला त्याचा काहीही फरक पडत नाही. मी माझी भूमिका मांडत राहणार असून बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केलाय.

मी शरद पवारांना मोजत नाही, तुम्ही त्यांना देव्हाऱ्यात पूजत बसा; पडळकरांचा घणाघात
सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर अज्ञात इसमाकडून दगडफेक

पवारांवर आरोप करून कुणी मोठा होत नाही, हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना भ्रम झाला आहे. तुम्ही शरद पवारांना देव्हाऱ्यात पूजत बसा मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही असंही पडळकर म्हणाले. काल माझ्यासोबत 20 लोक असतांना 29 जणांवर गुन्हा दाखल झाला असा आरोप करत अजित पवारांनी 5 हजार लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यालयाचं उदघाटन केलं त्यांच्यावर का गुन्हा दाखल केला नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. पोलिसांना काल सहकार्य केलं असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com