Vastu Shastra Medium site
लाईफस्टाईल

Vastu Shastra: आयुष्यात सुख- समृद्धी हवीय? मग 'या' गोष्टींचे देवाण-घेवाण करू नका

Vastu Shastra : वास्तुशास्त्रामध्ये कुंकू, बांगड्या, कपडे इत्यादींसह १० वस्तू कोणालाही देणं नुकसानकारक असल्याचं म्हटलंय. जर कोणी असं करत असेल तर त्याच्या घरात नेहमी आर्थिक अडचण आणि वाद होत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vastu Shastra Tips:

महागाई जास्त असल्याने आपण बहुतेकजण एकमेकांना मदत म्हणून अनेक वस्तूंची देवाण-घेवाण करत असतो. पैशाची अडचण असल्याने आपण वस्तूंची देवाण-घेवाण करतो. पण काही गोष्टी उसने घेणे आणि देणं आपल्याला आयुष्यासाठी घातक असतं. आयुष्यातील सुख-समृद्धी त्यामुळे दूर जात असते. (Latest News)

वास्तुशास्त्रामध्ये कुंकू, बांगड्या, कपडे इत्यादींसह १० वस्तू कोणालाही देणं नुकसानकारक असल्याचं म्हटलंय. जर कोणी असं करत असेल तर त्याच्या घरात नेहमी आर्थिक अडचण आणि वाद होत असतात.अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाच उसने देऊ नयेत याची माहिती आपण आज घेऊ.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कपडे

सध्या लोक भाड्याने कपडे घेतात किंवा मित्राचे कपडे घालतात. सध्या हा ट्रेंड झालाय पण शास्त्रात असे करण्यास मनाई आहे. असं करणाऱ्यांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांचे नशीबही त्यांची साथ देत नाही.

कंकू आणि बांगड्या

अनेकदा स्त्रिया एकमेकांच्या बांगड्या किंवा कंकू वापरतात, परंतु हे वाईट असल्याचं शास्त्रात म्हटलंय. दुसऱ्याचे मेकअप प्रोडक्ट वापरल्याने घरात त्रास आणि अशांतता निर्माण होत असते.

पलंग

वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे पलंग. दुसऱ्याचा पलंग कधीच वापरू नये. जे लोक असे करतात, त्यांच्या घरात गरिबी असते आणि त्यांना पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

घड्याळ

दुसऱ्याचे घड्याळ घेणे किंवा वापरणे चांगले नसते. दुसऱ्याचे घड्याळ घेतल्याने माणसाचा वेळ खराब होत असतो.

पेन

पेन कुणाकडून उसने घेऊनही वापरू नये. कोणाच्याही लेखणीचा वापर केल्याने आपल्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो, असं म्हटलं जातं.

हातरुमाल

जर तुम्ही दुसऱ्याचा हातरुमाल वापरत असला तर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे दुसऱ्याचा हातरुमाल कधीही वापरू नये.

कंगवा

अनेकदा लोक कोणाचाही कंगवा वापरतात, परंतु असे केल्याने आरोग्य आणि आर्थिक दोन्ही समस्या निर्माण होतात. जे असे करतात त्यांची तब्येत चांगली राहत नाही. त्यांच्याकडे टिकण्यासाठी पैसे नसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : बसमधून खाली उतरताच घडले भयानक; घराजवळच महिलेला एसटीने चिरडले

'Bigg Boss 19' फेम तान्या मित्तलचे साडी प्रेम, पाहा Unseen Photo

Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, ग्राहकांना महागाईचा धक्का; जाणून घ्या किती झाली दरवाढ?

माजी उपसरपंच अन् नर्तिकेचे Whatsapp चॅट्स समोर, आयुष्य संपवण्याची दिली होती धमकी

Mumbai Cricket Association: मुंबईत पोहोचली ICC वुमेंस वर्ल्डकप ट्रॉफी; माजी महिला कर्णधारांना MCA कडून खास सन्मान

SCROLL FOR NEXT