Earphone side effects saam tv
लाईफस्टाईल

Earphone side effects: इअरबड्स काढल्यानंतरही कानात शिट्टीसारखा आवाज ऐकू येतोय? शरीराचा हा इशारा अजिबात दुर्लक्षित करू नका

Earphone hearing loss: तासनतास इअरफोन किंवा इअरबड्स वापरल्याने कानात आवाज घुमणे, ऐकू कमी येणे, कानदुखी आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. मोठ्या आवाजात संगीत ऐकणे टाळा, इअरबड्स स्वच्छ ठेवा आणि कानांना नियमित विश्रांती देऊन श्रवण आरोग्याची काळजी घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

सकाळी प्रवासात, ऑफिसच्या कामात, जिममध्ये किंवा रात्री झोपण्यापूर्वीही कानात इअरफोन असणे आज अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. ‘थोडा वेळच तर वापरतोय’ असं म्हणत अनेक जण तासनतास मोठ्या आवाजात गाणी एकतात किंवा व्हिडिओ पाहतात. सुरुवातीला याचा काही त्रास जाणवत नसला तरी हळूहळू कानात आवाज घुमणे, ऐकू कमी येणे, कान दुखणे किंवा संसर्ग होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आवडत्या गाण्यांसोबत आपल्या कानांचे आरोग्यही जपणे गरजेचे आहे.

आज इअरफोन आणि इअरबड्स आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाले आहेत. प्रवासात गाणी ऐकणे, ऑनलाइन मिटींग्ज, मोठ्या आवाजात व्हिडिओ पाहणे किंवा फोनवर बोलणे यासाठी अनेक जण दररोज इअरफोन आणि इअरबड्सचा वापर करतात. तासनतास इअरफोन किंवा इअरबड्स वापरणे, मोठ्या आवाजात ऐकणे आणि कानांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे यामुळे कानांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इअरफोन आणि इअरबड्सचा वापर किती आणि कसा करावा, याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

मुंबईतील घाटकोपरमधील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलमधील कान,नाक,घसा विकार तज्ज्ञ डॉ. डॉ. सलोनी राज्यगुरू यांनी सांगितलं की, अनेक जण दिवसातून चार-पाच तास किंवा त्याहून अधिक काळ इअरफोन वापरतात. त्यातही आवाजाची पातळी जास्त असल्यास कानाच्या आतील भागातील नाजूक पेशींवर परिणाम होऊ शकतो. मोठ्या आवाजात दीर्घकाळ त्याचा वापर केल्याने मोठ्या आवाजामुळे श्रवणदोषाची समस्या निर्माण होऊ शकते. कानात सतत किंवा अधूनमधून शिट्टी वाजल्यासारखा किंवा आवाज येणे ज्याला टिनिटस म्हणतात., तसेच गर्दीच्या किंवा गोंगाटाच्या ठिकाणी संभाषण ऐकण्यास अडचण येणे, अशी लक्षणे दिसू शकतात.

इअरबड्स बराच वेळ कानात राहिल्यामुळे कानाच्या नलिकेत उष्णता आणि ओलावा साचून राहु शकतो. त्यामुळे जिवाणू किंवा बुरशी वाढण्यास पोषक वातावरण तयार होते आणि कानाच्या संसर्गाचा धोका वाढतो. अस्वच्छ इअरबड्स वापरणे किंवा इअरबड्स इतरांसोबत शेअर करणे टाळावे. यामुळेही कानाला संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते.

इअरबड्समुळे कानातील मळ आतल्या बाजूला ढकलला जाऊ शकतो. त्यामुळे कान बंद झाल्यासारखे वाटणे, कानात मळ साचल्यासारखे जाणवणे किंवा काही काळ ऐकण्याची क्षमता कमी होणे असे त्रास होऊ शकतात. तसेच बराच वेळ इअरबड्स वापरल्यामुळे कानात खाज येणे, दुखणे आणि त्वचेची जळजळ होऊ शकते.

इअरफोन आणि इअरबड्स वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांचा वापर मर्यादित ठेवावा. शक्यतो दिवसातून सुमारे एक तासापर्यंत वापर करणे आणि आवाजाची पातळी कमी ठेवणे योग्य आहे. सतत इअरफोन वापरण्याऐवजी मध्ये मध्ये कानांना विश्रांती द्यावी.

इअरबड्स उत्पादकाने दिलेल्या सूचनांनुसार नियमितपणे स्वच्छ करावेत. ते इतरांसोबत वापरू नयेत. कानात आवाज गुंजणे किंवा शिट्टी वाजल्यासारखे वाटणे, कान दुखणे किंवा कानातून असामान्य स्राव येणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कानाचा त्रास झाल्यास स्वतः औषधे घेणे किंवा घरगुती उपाय करणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात कोणतेही ड्रॉप्स वापरू नयेत. योग्य आवाजाची पातळी, मर्यादित वापर आणि कानांची स्वच्छता यामुळे इअरफोन आणि इअरबड्समुळे होणाऱ्या कानाच्या समस्या टाळण्यास मदत होऊ शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ....अन्यथा मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचा व शासकीय वाहनांचा लिलाव करणार- रविकांत तुपकर

Govinda: 'तू तिला माझी जागा देणार...'; गोविंदा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ? राखी सावंतसमोर सुनीताने केला मोठा खुलासा

Ganpati Festival : गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय! स्वस्तात एसटीचं तिकीट बुक करता येणार

Shiv Sena Symbol Case: धनुष्यबाण शिंदे गटाकडे राहणार की जाणार? प्रताप सरनाईक काय म्हणाले? Exclusive

सासू-सुनेमध्ये वारंवार खटके उडतात? भांडणं टाळण्यासाठी ‘या’ 5 वास्तु टिप्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT