Hair care, Hair falls problem, Hair care tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

हेअर ड्रायरचा वापर केल्याने वाढू शकते केस गळतीची समस्या

केसांची काळजी कशी राखाल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : आजच्या धावपळीच्या काळात आपण आपल्या कामासाठी वेळ काढतो परंतु, आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो.

हे देखील पहा -

केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक उत्पादनांचा वापर करत असतो. आजकालच्या फॅशन आणि मॉर्डनच्या जगात आपल्याला अपटू़डेट राहायला सगळ्यांना आवडते. केसांना चमक आणण्यासाठी आपण त्यांना रंगवतो किंवा त्याला निरनिराळे सिरम लावतो त्यामुळे केस गळतीची समस्या अधिक होते. प्रदूषण आणि तणावामुळे तसेही आपले केस कमजोर होत असतात. त्यामध्ये केसांना आपण ट्रिमिंग, पर्मिंग, कलरिंग व डाय केल्यामुळे केसांची मुळे कमजोर होतात व केस गळती सुरू होते. केस गळतीची सामान्य कारणांमध्ये शरीरात बदल, ताप, जीवनसत्त्वाची कमतरता, थायरॉइडची समस्या, हार्मोनल असंतुलन किंवा विषारी घटकांच्या दुष्परिणाम केसांवर होतात. त्याची नेमकी कारणे कोणती जाणून घेऊया.

१. केस गळण्याच्या मुख्य कारणांपैकी एक महत्त्वाचे कारणांपैकी महत्त्वाचे कारण तणाव. अधिक तणावामुळे केस गळतीची समस्या वाढू लागते.

२. डायटिंग करणेही आपल्या केसांसाठी (Hair) अधिक हानीकारक असू शकते. वजन कमी करण्याच्या नादात आपण डायटिंग करतो व त्याचा दुष्परिणाम आपल्याला केसांवर होतो व त्यामुळे केस गळतीची समस्या होते.

३. हेअर ट्रिटमेंटमध्ये पर्मिंग, स्ट्रेटनिंग, कलरिंगमुळे केसांचे नुकसान होते. अशाप्रकारच्या ट्रिटमेंटनंतर केस गळती अधिक होते. ट्रिटमेंट घेण्यापूर्वी हेअर प्रोटेक्टर सिरमचा वापर करा.

४. हेअर ड्रायरचाही वापर अधिक केल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते. यासाठी याचा वापर शक्यतो टाळावा किंवा कमी करावा. केसांना प्रथिनांची अधिक गरज असते. केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा (Water) वापर करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

SCROLL FOR NEXT