Skin care tips in marathi, Potato juice benefits for skin, how to control dark spots on face, dark spots natural remedy ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी असा करा बटाट्याच्या रसाचा उपयोग

बटाट्याचा रस सौंदर्य वाढवण्यासाठी वापरला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बटाट्याचा वापर सर्वसामान्यपणे सर्व घरांमध्ये होतो. बटाट्यामध्ये लोह, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने आणि जीवनसत्त्वे ए, बी आणि सी असतात, जे त्वचेसाठी व शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. बटाट्याचा रस त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतो. तसेच, निस्तेज त्वचा (Skin), काळी वर्तुळे कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. बटाट्याचा (Potatoes) रस सौंदर्य वाढवण्यासाठी वापरला जातो. बटाट्यामध्ये भरपूर पोषक असतात. बटाट्याच्या रसाचा फायदा आपल्या कसा होईल हे पाहूया. (Skin care tips in marathi)

हे देखील पहा -

बटाट्याच्या रसाचा असा करा उपयोग करा

१. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) ए, ब आणि क असल्यामुळे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी बटाट्याची साल बारीक करून घ्यावी. त्यानंतर चेहऱ्याला हलके मसाज करा. काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे त्वचेवरील काळे डाग दूर होण्यास मदत होईल.

२. आपली त्वचा पुन्हा तरुण बनवण्यासाठी अर्ध्या बटाट्याच्या रसात दोन चमचे दूध मिसळा. नंतर हे मिश्रण कापसाच्या साहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. अर्ध्या तासानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. असे केल्यास आपली त्वचा उजळण्यास मदत होते.

३. बटाट्याचा रस चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी गुणकारी आहे. बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्यानंतर २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ शकतात.

४. बटाट्याच्या रसामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग घटक आढळून येतात त्यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होते व चेहऱ्याला चमक येते. यासाठी बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळा. असे केल्याने आपल्या त्वचेच्या टोनमध्ये फरक दिसू लागेल.

५. बटाट्याचा रस कोरड्या त्वचेला ओलावा आणतो आणि त्वचा चमकदार बनवते. यासाठी बटाट्याच्या रसात दही मिसळा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

अशाप्रकारे आपण बटाट्याच्या रसाचा उपयोग त्वचेसाठी करु शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

SCROLL FOR NEXT