Skin Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips : त्वचेची काळजी घेण्यासाठी काकडीचा असा करा उपयोग, त्वचा चमकण्यासोबत वृद्धत्वाचा प्रभावही कमी होईल!

Benefits Of Cucumber : त्वचेवर निखार येण्यासाठी देखील तुम्ही काकडीचा वापर करू शकता.

कोमल दामुद्रे

Cucumber for Skin : त्वचेच्या सर्व समस्या किंवा आरोग्याचा कोणत्या ही समस्या निर्माण होण्याचे कारण असते ते म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता. काकडी मध्ये सुमारे 95 टक्के पाणी असते त्यामुळे काकडीचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा मिळतो, पण त्वचेवर निखार येण्यासाठी देखील तुम्ही काकडीचा वापर करू शकता.

तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही काकडीचा वापर करू शकता त्यासाठी तुम्ही काकडीचा रस किंवा काकडीचा फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता. काकडीमध्ये उपलब्ध असलेले जीवनसत्व आणि खनिजे त्वचा मॉइश्चरायझर करते.

त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्युटी रूटिनमध्ये काकडीचा समावेश करू शकता त्यासाठी तुम्हाला काकडीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येईल.

1. काकडीचा फेस पॅक

चेहऱ्यावरील (Skin) सुरकुत्या दूर करण्यासाठी आणि चेहरा चमकण्यासाठी काकडीचा वापर करायचा असेल तर तुम्हाला फक्त काकडी किसून पंधरा-वीस मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवायचे आहे आणि त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे.

2. काकडीचा रस

सकाळी रिकाम्या पोटी काकडीचा रस घेतल्याने शरीरातील घाण निघून जाते शरीर आतून स्वच्छ (Clean) राहण्यास मदत होते परिणामी चेहऱ्यावर वेगळीच चमक येते. त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम काकडी करते त्यामुळे तुम्ही हा उपाय करून त्वचेवरील सुरकुत्या कमी करू शकता किंवा त्वचेवरील ग्लो वाढवू शकता.

3. काकडीचे स्लाईस

तुम्हाला काकडीचा फेस पॅक किंवा काकडीचा रस पिणे कंटाळवाणे काम वाटत असेल.तर तुम्ही फक्त काकडीचे काप करून संपूर्ण चेहरा झाकून पंधरा-वीस मिनिटानंतर ते काढू शकता,असे करूनही तुम्ही त्वचेच्या समस्या सहज दूर करू शकता. डोळ्यांच्या खालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी काकडीचे स्लाईस डोळ्यांवर ठेवल्याने तुम्हाला फरक जाणवेल. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही काकडीचा वापर करून त्वचेच्या समस्या दूर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT