How Much Foam in Urine is Normal saam tv
लाईफस्टाईल

Foam in Urine: लघवीतून फेस येतोय, रंग बदलतोय; किती धोका आणि डॉक्टरांकडं नेमकं कधी जाल?

How Much Foam in Urine is Normal: लघवीमध्ये वारंवार फेस येत असेल तर ही परिस्थिती गंभीर असू शकते. अनेक लोक लघवीमध्ये फेस येण्याची समस्या सामान्य मानून त्याकडे दुर्लक्ष करतात.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्याला जडलेल्या आजारांची माहिती शरीर देत असतं. अनेकदा ही लक्षणं लघवीच्या माध्यमातून देखील दिसतात. कधीतरी लघवीमध्ये फेस येणं सामान्य असतं. प्रत्येक व्यक्तीने कधी ना कधी लघवीतून फेस येत असल्याचं पाहिलं असेल. परंतु लघवीमध्ये वारंवार फेस येत असेल तर ही परिस्थिती गंभीर असू शकते. अनेक लोक लघवीमध्ये फेस येण्याची समस्या सामान्य मानून त्याकडे दुर्लक्ष करतात.

आपल्याला जडलेल्या आजारांची माहिती शरीर देत असतं. अनेकदा ही लक्षणं लघवीच्या माध्यमातून देखील दिसतात. कधीतरी लघवीमध्ये फेस येणं सामान्य असतं. प्रत्येक व्यक्तीने कधी ना कधी लघवीतून फेस येत असल्याचं पाहिलं असेल. परंतु लघवीमध्ये वारंवार फेस येत असेल तर ही परिस्थिती गंभीर असू शकते. अनेक लोक लघवीमध्ये फेस येण्याची समस्या सामान्य मानून त्याकडे दुर्लक्ष करतात.

लघवीमध्ये फेस दिसणं किती सामान्य?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लघवीमध्ये कमी प्रमाणात फेस येणं सामान्य आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर त्याच्या लघवीमध्ये कमी प्रमाणात फेस येऊ शकतो. परंतु, लघवीमध्ये जास्त प्रमाणात फेस येत असल्यास या स्थितीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. लघवीमध्ये जास्त फेस येणं ही अत्यंत गंभीर स्थिती आहे. लघवीत फेस येणं हे गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.

परिस्थिती किती असू शकते चिंताजनक?

  • जर तुम्हाला वारंवार लघवीमध्ये फेस येत असेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जा.

  • लघवी करताना जळजळ किंवा वेदना होत असल्यास, ही स्थिती चिंताजनक असू शकते.

  • जर लघवीचा रंग गडद पिवळा किंवा फेसासह लाल असेल तर या स्थितीकडे दुर्लक्ष करू नका.

  • लघवीमध्ये फेस असल्यास तसंच शरीरात सूज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

  • पाय किंवा डोळ्यांभोवती सूज येण्याकडे दुर्लक्ष करू नका.

लघवीमध्ये कधी येऊ शकतो फेस?

  • शरीरातून जास्त प्रोटीन बाहेर पडणं

  • किडनीसंबंधीच्या समस्या

  • युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन

  • मूत्राशयावर अधिक दबाव पडणं

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

SCROLL FOR NEXT