Unintentional Weight Loss Saam Tv
लाईफस्टाईल

Unintentional Weight Loss : कितीही खाल्लं तरी अंगाला लागत नाही? जाणून घ्या असू शकतात या आजारांची लक्षणं

Weight Loss : जेव्हा जेव्हा शरीरात गंभीर आजार होतो तेव्हा शरीर अन्नातू्न मिळणारे पोषक शोषून घेणे थांबवते.

Shraddha Thik

Why Unintentional Weight Loss :

तुमचा आहार योग्य आहे, तुम्ही पोट भर खात आहात आणि तुम्हाला सर्वकाही बरोबर वाटत आहे, तरीही तुमचे वजन कमी होत असेल तर ही गंभीर बाब असू शकते. जेव्हा जेव्हा शरीरात गंभीर आजार होतो तेव्हा शरीर अन्नातू्न मिळणारे पोषक शोषून घेणे थांबवते.

यामुळे, असे घडते की आपण आपले नियमित अन्न खातो, परंतु शरीराला ते जाणवत नाही. त्यामुळे, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही सर्व काही व्यवस्थित करत आहात तरीही तुमचे वजन अचानक कमी होत आहे किंवा तुम्ही बारीक होत आहात तर हे या आजारांमुळे देखील असू शकते.

हायपरथायरॉईडीझम

जेव्हा थायरॉईड ग्रंथी खूप जास्त थायरॉईड संप्रेरक बनवते तेव्हा हायपरथायरॉईडीझम होतो. या स्थितीला ओव्हरएक्टिव्ह थायरॉईड असेही म्हणतात. हायपरथायरॉईडीझममुळे शरीरातील चयापचय गती वाढते. याचा अर्थ तुमचे शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी बर्न करू लागते. यामुळे वजन कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला असे काही वाटत असेल तर डॉक्टरांकडे (Doctor) जाऊन तपासणी करून घ्या.

मधुमेह

मधुमेह असलेल्या लोकांमध्ये, शरीराला ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी रक्तातील ग्लुकोज शरीराच्या पेशींमध्ये येण्यापासून अपुरे इन्सुलिन प्रतिबंधित करते. जेव्हा असे होते, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी चरबी आणि स्नायू बर्न करू लागते, ज्यामुळे शरीराचे वजन वेगाने कमी होते. त्यामुळे तुम्ही पाहिलेच असेल की अनेक मधुमेही रुग्ण खूप पातळ असतात.

मानसिक आजार

नैराश्य आणि OCD सारख्या मानसिक आजारांमुळेही अचानक वजन कमी होऊ शकते. वास्तविक, या काळात तुमची भूक आणि हार्मोनल आरोग्य (Health) इतके खराब होते की तुमचे वजन कमी होऊ लागते. तुम्ही खाल्ले तरी शरीराला अन्नातील पोषक तत्वे नीट शोषून घेता येत नाहीत.

पचन संस्थेतील बिघाड

सेलिआक डिसीज किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) तुमचे वजन झपाट्याने कमी करू शकते. सेलियाक रोग (Disease) हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामध्ये शरीर गव्हापासून बनवलेल्या पदार्थांवर हल्ला करते. दुसरे म्हणजे, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) च्या समस्येमध्ये तुमच्या पचनावर इतका परिणाम होतो की तुम्ही जे काही खाता ते तुमचे शरीर नीट पचवू शकत नाही आणि त्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control Drinks: डायबिटीज कायम नियंत्रणात ठेवायचाय? आजपासून डाएटमध्ये आवर्जून प्या 'हे' ३ हेल्दी ज्यूस

Pune: चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फुटणार; पुणे मेट्रो ५०८ मीटर लांबीचा फुट ओव्हर ब्रिज उभारणार

Homemade Face Pack : काळे डाग, पिंपल्स आठवड्याभरात होतील छुमंतर; चेहऱ्यावर लावा 'हा' फेसपॅक

Maharashtra Live News Update: पनवेल मधील सेक्टर ४ मध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू

Barshi : बार्शीतील व्यापाऱ्याची प्रामाणिकता; ज्वारीच्या पोत्यात सापडलेलं चार तोळे सोनं केलं परत

SCROLL FOR NEXT