दिवाळीनंतर येणारा सण म्हणजे तुळशी विवाह. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं. तुळशी विवाहानंतर हिंदू धर्मात लग्नसराईला आणि इतर शुभ कार्यांना सुरुवात होते. त्यामुळे अनेकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा २०२६ मध्ये तुळशी विवाह कधी आहे? पुजेचा शुभ मुहूर्त कोणता? तुळशी विवाहाची परंपरा का सुरू झाली? चला जाणून घेऊया.
यंदा तुळशी विवाह २१ नोव्हेंबर २०२६, शनिवारी साजरा केला जाणार आहे. हा दिवस कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला येतो.
देवउठणी एकादशी - २० नोव्हेंबर २०२६, शुक्रवार
द्वादशी तिथी सुरू - २१ नोव्हेंबर सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांनी
द्वादशी तिथी समाप्त - २२ नोव्हेंबर पहाटे ४ वाजून ५७ मिनिटांनी.
पंचांगानुसार, २१ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहासाठी सायंकाळचा प्रदोष काळ शुभ मानला जातो.
पूजेचा शुभ मुहूर्त - सायंकाळी ५:५९ ते रात्री ८:३३
सूर्यास्त - सायंकाळी ५:५९
काही कुटुंबांमध्ये देवउठणी एकादशी म्हणजेच २० नोव्हेंबरला तुळशी विवाह केला जातो. तर काही ठिकाणी द्वादशीला विवाह लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे आपल्या घरातील परंपरा आणि स्थानिक पंचांगानुसार मुहूर्त ठरवला जातो.
पौराणिक कथेनुसार, वृंदा ही भगवान विष्णूंची मोठी भक्त होती. तिचा विवाह जालंधर नावाच्या असुराशी झाला होता. वृंदा पतिव्रता असल्यामुळे जालंधराला पराभूत करणे देवतांना कठीण जात होते. त्यानंतर भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण केले. ही गोष्ट समजल्यानंतर वृंदेने विष्णूंना शाप दिला. पुढे वृंदेचा जन्म तुळशीच्या रोपाच्या रूपात झाला, अशी मान्यता आहे. भगवान विष्णूंनी तिला वरदान दिले की, तुळशीशिवाय त्यांची पूजा पूर्ण होणार नाही. तेव्हापासून तुळशी आणि शालिग्राम विवाहाची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते.
टीप: मुहूर्त आणि तिथी स्थानिक पंचांगानुसार बदलू शकतात. त्यामुळे पूजेपूर्वी स्थानिक पंचांग तपासावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.