Mysterious Train saam tv
लाईफस्टाईल

Mysterious Train: 100 हून जास्त प्रवाशांसह बोगद्यात शिरलेली ट्रेन अचानक झाली गायब; काय आहे या रहस्यमयी ट्रेनचं सत्य?

Surabhi Kocharekar

जगात अनेक रहस्य आहे. यापैकी काही रहस्य अशी आहेत, ज्यांचा उलगडा अजून झालेला नाही. वैज्ञानिकांनी अशी रहस्य उलगडण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आलं. जरी काही घटनांचा उलगडा झाला नाही तरीही त्या घटना चर्चेचा विषय आहेत.

अशाच एका घटनेविषयी आपण माहिती घेणार आहोत, ही घटना १९११ मध्ये घडली होती. यामध्ये एका ट्रेनने बोगद्यात प्रवेश केला आणि ती ट्रेन अचानक गायब झाली. या ट्रेनमध्ये एकूण १०६ प्रवासी होती. मात्र ही ट्रेन गायब होऊन अचानक कुठे गेली याचा पत्ता अजून लागलेला नाही. काय आहे हे नेमकं रहस्य जाणून घेऊया.

इटलीमध्ये गायब झाली होती ट्रेन

ही रहस्यमय घटना इटलीची राजधानी रोममध्ये घडली. 1911 मध्ये रोमन स्टेशनवरून एक ट्रेन निघाली होती. झानेटी नावाच्या या ट्रेनला एक बोगद्यामधून पुढच्या स्टेशनवर जायचं होतं. मात्र बोगद्यात शिरल्यानंतर ही ट्रेन अचानक गायब झाली. ही ट्रेन दुसऱ्या टोकातून बाहेर पडलीच नाही.

या ट्रेनमधून प्रवास करणारे दोन जणं मात्र ट्रेन गायब झाल्यानंतर सापडले. ज्यावेळी त्यांनी ही अशी धक्कादायक घटना सांगितली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. या दोन व्यक्तींच्या सांगण्यानुसार, ज्यावेळी ट्रेन बोगद्याजवळ पोहोचली तेव्हा तिथून एका विशिष्ट प्रकारचा धूर बाहेर पडला. त्यानंतर दोघेही घाबरले आणि त्यांनी ट्रेनमधून उडी मारली.

बोगद्यात कशी गायब झाली ट्रेन?

या गूढ घटनेबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या. असं म्हटलं गेलं, ही ट्रेन वर्तमानापेक्षा 71 वर्षे मागे म्हणजेच भूतकाळात गेली. बोगद्यात गायब झालेली ट्रेन 1840 मध्ये मेक्सिकोला पोहोचली होती, असंही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं. यामुळे लोक या ट्रेनला झपाटलेली ट्रेन असंही देखील म्हणतात.

मेक्सिकोच्या एका डॉक्टरांनी दावा केला होता. या डॉक्टरांच्या दाव्यानुसार, त्यांच्या रूग्णालयामध्ये 104 लोकांना अचानक दाखल करण्यात आलं होतं. मात्र या सर्व लोकांची मानसिक स्थिती फारशी चांगली नव्हती. इतकंच नाही तर हे सर्व रूग्ण ट्रेनने या ठिकाणी पोहोचल्याचं म्हणत होते.

रहस्यमयी पद्धतीने बोगद्यात गायब झालेली ही ट्रेन इटली, जर्मनी तसंच रोमानिया या ठिकाणी पाहण्यात आल्याचा दावा करण्यात येतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT