वीकेंड म्हटल्यावर सर्वांनाच फिरायला जायचे असतात. त्यात ऑक्टोबर हिटमध्ये गारवा अनुभवायचा असतो. त्यामुळे अनेकांना फिरायला जाण्याचा मोह आवरणार नाही. ऑक्टोबर महिन्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. या हलक्या थंडीत तुम्हीही फिरायला जायाचा विचार करताय. तर काही निसर्गरम्य स्थळांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
भारत देशाला निसर्गाचा वारसा लाभला आहे. भारतात अनेक स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता. सध्या हवामानातील उष्णतेचे प्रमाण कमी होत आहे तर हलकी थंडी सुरू झाली आहे. तसेच या महिन्यात रामनवमी, दसरा अशा अनेक सुट्ट्या आहेत. त्यामुळे फिरण्यासाठी उत्तम वातावरण आणि सुट्ट्या असा चांगला योग जुळून आला आहे.
कर्नाटकमधील हंपी शहर युनेस्कोतील वारसा स्थळांपैकी एक आहे. येथे अनेक पुरातन काळातील वास्तू आहेत. हे शहर प्राचीन मंदिरे, त्यावर बारीक नक्षीकाम आणि विशाल रचनांसाठी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वास्तू पाहायच्या असतील तर हंपी हे शहर उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही विविध देवदेवतांच्या मंदिराना भेट देऊ शकता.
जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य भारतात आहे. ते म्हणजे ताजमहाल. ताजमहाल प्रेमाचे प्रतिक आहे. भारतातील हे एक सुंदर स्थळ आहे. यमुना नदीच्या किनारी वसलेल्या ताजमहालला तुम्ही नक्की भेट द्या. ताजमहालशिवाय येथे आग्रा किल्ला, जामा मशीद, मेहताब बाग, अकबराचा मकबरा, फतेहपूर सिक्रीलाही भेट देऊ शकता.
कोलकत्ता हे शहर निसर्गाने समृद्ध आहे. कोलकत्ता शहराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ऑक्टोबर महिन्यात येथे दुर्गा पूजा मोठा उत्साहात साजरी केली जाते. आठवडाभर दुर्गापूजेचा उत्सव सुरू असतो. हा उत्सव पाहण्यासारखा असतो. याशिवाय तुम्ही निक्को पार्क, व्हिक्टोरिया मेमोरियल अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.
डोंगर, दऱ्या, नदी असे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले शहर म्हणजे ऋषिकेश. ऑक्टोबर महिन्यात तुम्ही ऋषिकेशला भेट द्या. गंगा नदीच्या किनारी तुम्ही निसर्गाचा अनुभव घेऊ शकतात. येथे जाऊन तुम्हाला खूप छान वाटेल. इथे अनेक अॅडव्हेंचर अॅक्टीव्हिटी करु शकतात. येथील मंदीरे, पुल, नदी, धबधबा आणि त्रिवेणी घाट प्रमुख आकर्षणे आहेत.
दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. दार्जिलिंगला निसर्गसौंदर्य लाभले आहे. येथील हवा आणि वातावरण आपल्याला फ्रेश ठेवतात. पश्चिम बंगालमधील सर्वोच्च हिल स्टेशन म्हणून दार्जिलिंग ओळखले जाते. येथील पद्मजा नायडू पार्क, रॉक गार्डन, टायगर हिल ही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.