Chandra Grahan today saam tv
लाईफस्टाईल

Blood Moon 2025: आज भारतात दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ब्लड मूनची अद्भुत दृश्यं पाहण्याची संधी

Chandra Grahan today: खगोलशास्त्रप्रेमींसाठी आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही आजचा दिवस खूप खास आहे. आज खग्रास चंद्र ग्रहण लागत आहे. या ग्रहणादरम्यान चंद्र पूर्ण लाल रंगाचा दिसेल, ज्याला 'ब्लड मून' असेही म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • आज रात्री खग्रास चंद्रग्रहण होणार आहे.

  • चंद्र लालसर रंगाचा दिसेल, त्यामुळे त्याला 'ब्लड मून' म्हणतात.

  • ग्रहणाची पूर्ण अवस्था रात्री ११ वाजता सुरू होईल.

आज भारतात आकाशातील एक वेधक आणि दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. आज रात्री आकाशात खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून या ग्रहणादरम्यान चंद्र लालसर रंगाचा दिसेल. त्यामुळे याला ‘ब्लड मून’ किंवा ‘रेड मून’ असेही म्हटले जाते. खगोल अभ्यासक आणि विज्ञान प्रेमींसाठी ही घटना मोठा अनुभव ठरणार आहे.

कधी होणार चंद्रग्रहणाला सुरुवात?

स्काय वॉच ग्रुप यांचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपणे, यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री ९ वाजता छायाकल्प चंद्रग्रहणास सुरुवात होणार आहे. त्यानंतर रात्री ९.५७ वाजता खंडग्रास अवस्था सुरू होणार आहे. त्यानंतर रात्री ११ वाजता पूर्ण खग्रास अवस्था दिसणार आहे. ही अवस्था तब्बल २ तास ७ मिनिटं असणार आहे. तर रात्री १२.२२ वाजेपर्यंत ती पाहता येणार आहे. या काळात चंद्र लालसर व तांबूस रंगाचा भासेल.

हे ग्रहण एकूण ५ तास २७ मिनिटांचं असणार आहे. हवामान स्वच्छ राहिल्यास देशातील बहुतेक भागातून ते स्पष्ट दिसण्याची शक्यता आहे. अभ्यासकांच्या मते, यावर्षी भारतातून फार कमी ग्रहणं दिसली आहेत. त्यामुळे हे खग्रास चंद्रग्रहण हा विशेष खगोल सोहळा मानला जात आहे.

चोपणे यांनी सांगितले की, ग्रहण हे पूर्णपणे खगोलीय आणि वैज्ञानिक घटना असून त्याबाबत कोणत्याही अंधश्रद्धा पसरवू नये. उलट विज्ञाननिष्ठ पद्धतीने या घटनेचे निरीक्षण आणि अभ्यास करावा. चंद्रग्रहणाचा मानवी आरोग्य, जीवन किंवा शुभाशुभाशी कोणताही संबंध नसल्याचे ते म्हणाले.

कसं पाहता येईल हे ग्रहण?

ग्रहणाच्या वेळी आकाश निरभ्र राहिल्यास नुसत्या डोळ्यांनीही ते पाहता येईल. मात्र दुर्बिण किंवा दूरदर्शकातून निरीक्षण केल्यास या घटनेची अधिक सुंदर झलक पाहायला मिळू शकेल. खगोल अभ्यासक आणि विज्ञानप्रेमींसाठी हे निरीक्षण भविष्यातील संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे.

आज रात्री होणारे खग्रास चंद्रग्रहण हे सामान्य लोकांसाठीही आकाश निरीक्षणाचा एक खास क्षण ठरणार आहे. लालसर रंगाचा दिसणारा चंद्र, स्वच्छ आकाश आणि विज्ञानाशी जोडलेले हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी खगोलप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.

विशेष म्हणजे, आजच्या ग्रहणानंतर या वर्षातील शेवटचं मोठं आकाशीय आकर्षण म्हणजे सूर्यग्रहण होणार आहे. ते २१ सप्टेंबर रोजी होईल, मात्र हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक व अटलांटिक महासागर परिसरातूनच ते पाहता येईल.

आजच्या चंद्रग्रहणाला कोणते नाव दिले जाते?

या चंद्रग्रहणाला ‘ब्लड मून’ किंवा ‘रेड मून’ म्हणतात.

खग्रास चंद्रग्रहण किती वाजता सुरू होणार आहे?

छायाकल्प रात्री ९ वाजता सुरू होईल.

पूर्ण खग्रास अवस्था किती वाजता सुरू होईल?

रात्री ११ वाजता पूर्ण खग्रास अवस्था सुरू होईल.

चंद्रग्रहण किती काळ चालेल?

ग्रहण एकूण ५ तास २७ मिनिटे चालेल.

भारतातून पुढचे सूर्यग्रहण केव्हा पाहता येईल?

२१ सप्टेंबर रोजीचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach Cancer : वजन कमी, पोट दुखी जळजळ आणि अस्वस्थता जाणवतेय? स्टेज 1 कॅन्सरची हेच तर लक्षण नाही? जाणून घ्या

आईला बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवताना पाहिलं; मुलीचा गळा आवळून विहिरीत फेकलं, कलयुगी आईचा प्रताप

Virar Building Collapse: विरारमध्ये 40 वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला अन् पुढे काय घडल? VIDEO

Dhule Accident : भीषण अपघात; ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने ट्रक अनियंत्रित, दोघांचा मृत्यू

Russia- Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; टार्गेटवर कीवमधील मंत्री, कॅबिनेट इमारतीतून उठले धुरांचे लोट

SCROLL FOR NEXT