Essential Calcium Sources for Daily Diet Saam
लाईफस्टाईल

तिशीनंतर हाडांचं दुखणं वाढलंय? रोज खा '१' पदार्थ; दुधापेक्षाही दुप्पट कॅल्शियम मिळेल

Essential Calcium Sources for Daily Diet: कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडं ठिसूळ होतात अन् दात दुखतात. कॅल्शियमसाठी रोज एक पदार्थ खा.

Bhagyashree Kamble

कॅल्शियम आपल्या हाडांना आणि दातांना मजबूत करण्यास मदत करते. शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडं ठिसूळ होतात. तसेच कमी वयात हाडांचा त्रास उद्भवतात. यासह ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांचा धोका वाढतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांची दुखणी, दातदुखीचा त्रास, चक्कर येणे, मुंग्या येणे अशा प्रकारचे त्रास जाणवतात. अशावेळी ताबडतोब कॅल्शियमयुक्त पदार्थ खाण्यास सुरूवात करा.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खा. आहारात दूध, चीज, ताक या कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. या पदार्थांचा आहारात समावश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते.

कॅल्शियमसाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. पालक, मेथी, कांदा पात, अशा प्रकारचे पालेभाज्या खा. पालेभाज्यांमध्ये लोह आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात.

दररोज सुका मेवा किंवा बियांचा आहारात समावेश करा. बदाम, तीळ आणि चिया सीड्समध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. बदाममध्ये कॅल्शियमव्यतिरिक्त इतरही घटक असतात जे शरीराला पोषण देतात.

आहारात डाळी, हरभरा, आणि सोया उत्पदानांचा समावेश करा. राजमा, चणे आणि ड़ाळी शरीरातील कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करतात. टोफू आणि सोया मिल्क देखील उत्तम पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सासू-सुनेमध्ये वारंवार खटके उडतात? भांडणं टाळण्यासाठी ‘या’ 5 वास्तु टिप्स नक्की फॉलो करा

Maharashtra News Live Update: दोन दिवसात सोनं- चांदी दरात मोठी वाढ! सोनं साडेचार हजारांनी तर चांदी अकरा हजार रुपयांनी महाग

Government Schemes : सरकारी योजनांवर VIDEO बनवा अन् कमवा तब्बल 1 लाख रुपये, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा

Vanita Kharat: फोन उचलताच बँक अकाऊंट रिकामं, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनीता खरातला हजारोंचा गंडा घातला; VIDEO चर्चेत

VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्ट

SCROLL FOR NEXT