Google Doodle 
लाईफस्टाईल

Google Doodle: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुगलचे खास डूडल, महिलांना दिला सन्मान

युनियटेड नेशन्सने 8 मार्च 1957 दिवशी पासून महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: आज म्हणजेच 8 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. त्याचबरोबर या खास प्रसंगी गुगलने खास डूडल (Google Doodle) बनवून जगभरातील महिलांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन (Women's Day) हा महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, तसेच स्त्रियांबद्दल आदर, प्रशंसा आणि प्रेम दर्शवितो. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 च्या निमित्ताने Google ने एक क्रिएटिव्ह डूडल बनवले आहे.

हे डूडल महिलांचा संयम, त्याग आणि त्यांचा आत्मविश्वास दाखवत आहे. गुगलच्या होमपेजवर सुंदर अश्या अॅनिमेटेड स्लाइड शोसह डूडल खूप आकर्षक दिसत आहे. या डूडलमध्ये विविध संस्कृतीतील महिलांच्या जीवनाचे चित्रण करण्यात आले आहे. घरातील कामाबरोबरच एक स्त्री बाहेरच्या जगात स्वतःचे नाव कसे कमावते आहे हे यात दाखवण्यात आले आहे. आज आपण पाहतो, प्रत्येक क्षेत्रात महिलांसमोर अनेक मोठी आव्हाने उभी आहेत, या आव्हानांना त्या उत्कृष्ट प्रकारे सामना करत आहेत.

हे देखील पहा-

संयुक्त राष्ट्र (United States) संघाने 8 मार्च 1975 रोजी महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली. पण, त्याआधीच 1909 मध्येच हा दिवस साजरा करण्यास परवानगी देण्यात आली होती. खरं तर, 1909 साली अमेरिकेत (America) पहिल्यांदा 28 फेब्रुवारीला महिला दिन साजरा करण्यात आला. सन 1908 मध्ये न्यू यॉर्कमधील (New York) गारमेंट कामगारांच्या संपाचा सन्मान करण्यासाठी अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने हा दिवस निवडला होता.

त्याच वेळी, रशियन महिलांनी 28 फेब्रुवारी रोजी महिला दिन साजरा करून प्रथमच पहिल्या महायुद्धाचा निषेध केला होता. 1917 मध्ये रशियन महिला ब्रेड आणि तुकड्याच्या मागणीसाठी संपावर गेल्या होत्या. फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी संप सुरू झाला. तो ऐतिहासिक संप होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

SCROLL FOR NEXT