Petrol Diesel Price (11 September)  Saam Tv
लाईफस्टाईल

Petrol Diesel Price (11 September) : आजही मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचे वाढले दर, पाहा इतर शहरातला भाव

Shraddha Thik

Petrol Diesel Price :

कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा प्रति बॅरल $90 ची पातळी ओलांडली आहे. सोमवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून आला. आज सकाळी अनेक शहरांमध्ये तेलाच्या किरकोळ किमती बदलल्या आहेत. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. जागतिक बाजारात (Market) ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 90.25 पर्यंत वाढली आहे. WTI ची किंमत देखील प्रति बॅरल $ 86.84 पर्यंत वाढली आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली - पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये

मुंबई - पेट्रोल (Petrol) 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये किंमती किती बदलल्या

पुणे - पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 106.54 रुपये प्रति लिटर

ठाणे - पेट्रोल 106.8 रुपये आणि डिझेल 105.74 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद - पेट्रोल 107.75 रुपये आणि डिझेल 108 रुपये प्रति लिटर

नाशिक - पेट्रोल 106.22 रुपये आणि डिझेल 106.12 रुपये प्रति लिटर

नागपूर - पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 106.45 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर - पेट्रोल 106.92 रुपये आणि डिझेल 106.06 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमतीवर व्हॅट

मूल्यवर्धित कर (Value Added Tax) हे व्हॅट चे फुलफॉर्म आहे. VAT हा एक उपभोग कर आहे जो Goods And Servicesवर सरकारद्वारे (Government) आकारला जातो. जेव्हा उत्पादनाच्या टप्प्यापासून विक्रीच्या बिंदूपर्यंत पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर value add केली जाते. वापरकर्त्याने दिलेली व्हॅटची रक्कम ही उत्पादनाच्या किमतीवर आधीपासून आकारलेली असते त्यामुळे ती उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या खर्चापेक्षा कमी असते.

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या खालील शहरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पेट्रोलवर राज्य आकारणीच्या 39.54% VAT भरावा लागतो आणि उर्वरित महाराष्ट्र शहरांमध्ये सर्व इंधन भरण्याच्या केंद्रांवर पेट्रोलवर 38.52% VAT आकारला जातो. मुंबई शहरांमध्ये पेट्रोलचे दर देशातील उच्च राज्य आकारल्या जाणार्‍या मूल्यवर्धित करामुळे सर्वाधिक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT