Happy Married Life Tips  Canva
लाईफस्टाईल

Relationship Tips: सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी लक्षात ठेवा '3C'चा फॉर्मुला; काय आहे हा फॉर्मुला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Happy Married Life Tips How To Bond With your Partner :

सध्या घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलीय. अनेक जोडपी संसार थाटून १५ ते २० वर्ष झाल्यानंतर मध्येच काडीमोड करत असतात. हे चित्र पाहून लग्न हा योग्य निर्णय आहे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. प्रेम, विश्वास आणि गैरसमजाचा अभाव केवळ अरेंज्ड मॅरेजमध्येच दिसत नाही, तर आता प्रेमविवाह करणाऱ्यांनाही या समस्या भेडसावत आहेत. सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा कोर्स करण्याची गरज नाही किंवा मोठी पुस्तके वाचण्याची गरज नाही, यासाठी फक्त ३ गोष्टी आवश्यक आहेत.(Latest News)

वचनबद्धता commitment

जोडपे एकमेकांपासून दूर होण्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे बांधिलकी नसणं. एकमेकांविषयीची बांधिलकीचा अभाव असेल तर तुमच्या नातेसंबंधात फूट पडत असते. जर तुम्ही कोणाशी लग्न केले असेल आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन दिले जाते. तुमची बांधिलकी दाखवण्यासाठी सोशल मीडियावर शो ऑफ करण्याची गरज नाही, तर तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकात त्याला वेळ द्यावी लागते.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संवाद communication

जोडप्यांमध्ये भांडणे ही खूप सामान्य गोष्ट आहे परंतु हे भांडणं घर-खानदान आधी पर्यंत जाईल इतकं वाढू देऊ नका. जेव्हा दोघांमधील भांडणं त्यांच्या कुटुंबियांपर्यंत जातं तेव्हा नवरा बायकोमधील संवाद कमी होण्यास सुरुवात होते. अनेकजण एकमेकांसोबत बोलणं टाळतात. कम्युनिकेशन गॅप कोणत्याही नात्यासाठी चांगली नसते. तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन आनंदात घालवायचे असेल तर संवाद खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती तुमच्या मनात ठेवू नका, तर त्याला सांगा. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होतील.

तडजोड Compromise

पती-पत्नीने एकमेकांच्या आनंदासाठी आणि संसाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी काही गोष्टींमध्ये तडजोड करणं आवश्यक आहे. करिअर, कुटुंब, आनंद आणि स्वातंत्र्य या सगळ्यांशी तडजोड करण्याची अपेक्षा फक्त महिलांकडून केल्यास नातं नीट चालणार नाही. आवश्यक तेथे काही त्याग करण्याची तयारी ठेवा. लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची विभागणी केली पाहिजे. यामुळे तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

SCROLL FOR NEXT