Tirupati Balaji Travel Saam Tv
लाईफस्टाईल

Tirupati Balaji Travel : तिरुपती बालाजीला जाण्याचा प्लान करताय? जाणून घ्या दर्शनाची वेळ आणि तिकीट खर्च

Tirupati Balaji Darshan : उन्हाळ्याची सुट्टी किंवा वीकेंडचा प्लान केला जातो. परंतु, नेमके जायचे कुठे हा अनेकांचा प्रश्न असतो. जर तुम्ही देखील देवदर्शनाचा प्लान करत असाल तर तिरुपती बालाजीला जाऊ शकता.

कोमल दामुद्रे

Tirupati Balaji Temple Timing :

उन्हाळ्याची सुट्टी किंवा वीकेंडचा प्लान केला जातो. परंतु, नेमके जायचे कुठे हा अनेकांचा प्रश्न असतो. जर तुम्ही देखील देवदर्शनाचा प्लान करत असाल तर तिरुपती बालाजीला जाऊ शकता.

आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती बालाजी हे जगातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराशी संबंधित अनेक रहस्य देखील आहे. हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी (Temple) एक मानले जाते. येथे जगभरातील लोकांची मंदिराप्रती असलेली श्रद्धा पाहायला मिळते.

वेंकटेश्वर स्वामी हे या मंदिराचे मुख्य देवता आहेत. ज्यांना भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. जर तुम्ही तिरुपती बालाजी (Tirupati Balaji) मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तिकीट बुकिंग प्रक्रिया, वेळ (Time) आणि तिकीटांच्या किमतीशी संबंधित गोष्टी माहित असायला हव्या. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. मंदिरात दर्शनाची वेळ

तिरुपती बालाजी मंदिर ब्रह्मोत्सवासारख्या काही विशेष प्रसंगी वगळता वर्षभर भक्तांसाठी खुले असते. मंदिरात दर्शन घेण्याची वेळ ही सकाळी३ ते दुपारी १.३० पर्यंत नंतर दुपारी २.३० ते रात्री ९.३० पर्यंत आहे. हे मंदिर शुक्रवार आणि शनिवारी २४ तास भाविकांसाठी उघडे असते. परंतु, मंदिराच्या आत वेगवेगळ्या विधींमुळे वेळ बदलू शकते.

2. तिकीटाची किंमत

तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शनासाठी तिकीटाची किंमत दर्शनाच्या प्रकारानुसार बदलते. तसेच साधारणत: व्हीआयपी दर्शनासाठी ३०० रुपये मोजावे लागतील. यासाठी तुम्हाला ५० रुपयांमध्ये सामान्य तिकीट मिळेल.

3. मंदिराशी निगडीत रहस्य

बालाजी मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच याविषयी अधिक रहस्ये आहेत. असे मानले जाते की, मंदिराचा इतिहास ९ व्या शतकापासून सुरु होतो. श्री वेंकटेश्वराचे हे पवित्र आणि प्राचीन मंदिर वेंकटद्री नावाच्या पर्वताच्या सातव्या शिखरावर वसलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT