Fasting Recipe
Fasting Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Fasting Recipe : सतत साबुदाणा खाऊन वैतागले आहात? 'या' उपवासाच्या रेसिपी ट्राय करुन पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fasting Recipe : अनेक व्यक्तींना उपवासादरम्यान सफेद मिठ आणि सैंधव मिठ खायचे नसते. अशावेळी तुम्ही उपवासासाठी बिनामिठाची चविष्ट रेसीपी घरच्या घरी बनवु शकता.

फळांपासून तुम्ही न मिठ टाकता अनेक प्रकारच्या रेसीपी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच एक रेसीपी सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला उपवासाच्या दिवशी चांगले, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ खाता येतील.

मखाना मिल्क -

तुम्हाला दुध (Milk) पिण्यास आवडत असेल तर, तुम्ही मखाण्याचे दुध बनवुन पिऊ शकता. हे दुध बनवणे अतिशय सोपे आहे. यासाठी दोन कप मखाने, अर्धा किलो ग्राम दुध, दोन चमचे साखर आणि दोन चमचे शुद्ध गाईचे तूप.

बनवण्याची पद्धत -

सर्वात आधी गॅसवर (Gas) पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यामध्ये मखाने चांगले भाजून घ्या. आता मखाण्यांना एका डिशमध्ये काढून थंड करून घ्या. आता हे मखाणे जाडसर कुटून घ्या आणि दुध उकळल्यानंतर त्यामध्ये मखाने आणि साखर घालून चांगले शिजवून घ्या. आता गॅस बंद करून घट्ट मखाण्याची खीर गरमागरम सर्व करा.

उपवासासाठी बनवा दह्याचे बटाटे -

उपवसामध्ये तुम्ही मिठ न वापरता चटपटीत बटाटे बनवू शकता. यासाठी तुम्हाला दही, उकळलेले बटाटे, भाजलेले जिरे, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर, काळी मिरी पूड, लाल तिखट, आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि लिंबू या सगळ्या सामग्रीची गरज दह्याचे बटाटे बनविण्यासाठी लागणार आहे.

बनवण्याची पद्धत -

जर तुम्ही उपवासासाठी ही रेसीपी बनवत असाल तर, सर्वात आधी बटाटे स्मॅश करुन घ्या. त्यानंतर त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, आमचूर पावडर, काळी मिरी पूड या सगळ्या गोष्टी घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण दह्यामध्ये मिक्स करून सर्व करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

Ravindra Dhangekar | Viral Video वर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया!

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! करावं लागेल हे काम

Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

SCROLL FOR NEXT