Beauty Tips
Beauty Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Beauty Tips : सतत लिपस्टिक लावण्याचा तुम्हालाही कंटाळा येतोय ? तर 'या' टिप्स फॉलो करुन ओठांचे सौंदर्य टिकवा

कोमल दामुद्रे

Beauty Tips : आजच्या या मॉडर्न युगात प्रत्येक मुलगी लिपस्टिक लावते. काही मुली लिपस्टिक शिवाय घराबाहेर पडतच नाही. सुंदर दिसण्यासाठी अनेक मुली मेकअप करतात. दहा मधील एकच मुलगी अशी असेल जिला मेकअप करणं आवडत नसेल. मेकअप म्हटलं तर लिपस्टिक ही आलीचं. लिपस्टिक ही मेकअप मधली अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते.

तुमची लिपस्टिक लाँग लास्टिंग राहावी आणि तुमचे ओठ जास्त आकर्षक दिसावे यासाठी तुम्ही कशा पद्धतीने लिपस्टिक लावायला हवी. त्याबद्दल आम्ही सांगणार आहोत.

1. लिपस्टिक लाँग लास्टिंग राहण्यासाठी तुम्ही लिप लाइनर वापरा :

तुम्हाला तुमची लिपस्टिक लाँग लास्टिंग ठेवायची असेल तर लिपस्टिक लावण्याआधी ओठांवरती लीप लाइनरचा वापर करा. खरंतर ओठांवरती लीप लाइनर लावल्याने तुमच्या ओठांवरती एक बेस निर्माण होतो. ज्यामुळे तुमची लिपस्टिक स्प्रेड होत नाही. त्याचबरोबर तुम्ही वॉटरप्रूफ लिपस्टिक वापरली पाहिजे आणि लिफ्ट लाइनर सुद्धा वॉटरप्रूफच वापरले पाहिजे.

2. तुमचे ओठ मुलायम बनवा :

लिपस्टिक लावण्याआधी तुमचे ओठ हायड्रेट असले पाहिजे. तुम्हाला तुमची लिपस्टिक लावून लास्टिंग हवी असेल तर लिपस्टिक लावायच्या आधी तुम्हाला व्हॅसलीन किंवा लीपबाम सारख्या प्रसाधनांचा (Product) वापर केला पाहिजे. असे केल्याने तुमची लिपस्टिक जास्त वेळ (Time) तुमच्या ओठांवर राहील.

Lipstick

3. लॉंग लास्टिंग लिपस्टिक वापरा :

तुम्हाला सारखं सारखं लिपस्टिक (Lipsticks) लावण्यापासून वाचायचे असेल तर, तुम्ही लाँगलास्ट लिपस्टिकचा वापर करा. यामध्ये तुम्ही मॅटफिनिश लिपस्टिक निवडू शकता.

4. पावडरचा वापर करा :

तुम्हाला जर वाटत असेल की , तुमची लिपस्टिक जास्त काळ ओठांवरती टिकून राहावी. तर तुम्ही लिपस्टिक लावून झाल्यावर ओठांवरती थोडासा पावडर लावा. एखाद्या पावडर ब्रशच्या मदतीने ओठांवरती पावडर अप्लाय करा. त्यानंतर टिशू पेपरच्या मदतीने एक्स्ट्रा पावडर साफ करून घ्या. असं केल्याने तुमची लिपस्टिक लाँग लास्टिंग राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

Special Report : कुलरची थंड थंड हवा ठरतेय जिवघेणी! 7 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT