Screen time side effects  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

स्क्रीन टाइमचा मुलांच्या मानसिकतेवर असा होतोय परिणाम.

शारीरिक, मानसिक, भावनिक, व्यावहारिक आणि संज्ञानात्मक विकासाचे मुद्दे थेट मुलांनी पडद्यासमोर पाहाणे किती वेळ चांगले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्या कोरोना (Corona) काळानंतर मुलांचे स्क्रीन टाइम (Time) पाहणे वाढले आहे. परंतु त्याच्या परिणाम मुलांच्या (Child) शारीरिक व मानिसक आरोग्यावर होताना दिसून येत आहे. तसेच, सर्वसाधारणपणे मुले त्यांच्या सभोवतालच्या वातावरणातून आणि प्रौढांच्या, पालकांच्या वर्तनातून नेहमी चांगल्या-वाईट गोष्टी शिकत असतात.

हे देखील पहा -

सध्या उन्हाळी सुट्टी सुरु झाल्यामुळे मुले पुन्हा स्क्रीन टाइमकडे वळू लागली आहेत. त्यामुळे आभासी जगासमोर म्हणजेच स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवला तर खेळ, व्यायाम, लोकांना भेटणे, बोलणे आणि जीवनात उपयुक्त असणारी कौशल्ये शिकणे याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे मुले आजूबाजूच्या वातावरणापासून दूर जातात आणि त्यांची वागणूक स्क्रीनवर दिसणार्‍या आभासी जगासारखी होऊ लागते. यांचा मुलांच्या विकासावर कसा परिणाम होतो ते पाहूया.

१. भाषा ही कुटुंब आणि समाजातून शिकण्याची गोष्ट जरी असली तरी त्यात ज्ञान आणि माहिती देखील समाविष्ट आहे. परंतु, स्क्रीन टाइम भाषेचे आकलन आणि भाषेच्या वापरावर परिणाम करताना दिसून येत आहे. स्क्रीनचा परिणामामुळे मुलांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोली यांचावर परिणाम होताना दिसून येत आहे. तसेच, स्क्रीन टाइमवर असलेल्या मुलांना वाचण्याची इच्छा कमी होते.

२. स्क्रीनमधून उत्सर्जित होणारे किरण आणि त्याच्या प्रकाशामुळे झोपेची समस्या निर्माण होते. कारण, स्लीप हार्मोन मेलाटोनिनच्या उत्सर्जनात अडथळा निर्माण होऊन झोपेची समस्या अधिक प्रमाणात लहान मुलांपासून वाढत्या मुलांपर्यंत दिसून येत आहे.

३. मुलाच्या भावनिक वर्तनावर अनेक प्रकारे परिणाम होतो. डिजिटल मीडियामुळे मुलांच्या कल्पनाशक्ती चांगला-वाईट प्रभाव होत आहे. चिडचिड, निराशा, चिंता आणि आवेगपूर्ण विकार हे सर्व मुलांमध्ये स्क्रीन टाइमच्या परिणाम म्हणून दिसत आहे. त्यामुळे ते वास्तविक जगातील व्यक्तीशी योग्य संवाद साधत नाही.

४. तसेच व्हिडिओमध्ये अतिशय वेगाने फिरणारी चित्रे आणि रंग त्यांचा प्रभाव मुलांवर सोडत असतात. अधिक वेळ स्क्रीन टाईमवर असल्यास डोळ्यांना आणि मेंदूला सवय होते आणि मानिसक आजार होऊ लागतात.

५. ज्या मुलांचा स्मार्टफोन, टॅबलेट आणि व्हिडिओ गेम्सचा वेळ दिवसातून सात तास किंवा त्याहून अधिक होता, त्यांच्या एमआरआय स्कॅनमध्ये सामान्य मेंदूपेक्षा मेंदूच्या काही भागात लक्षणीय फरक दिसतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी आपल्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन एक्स्प्रेस आज रद्द

Mumbai Airport: मुंबई आभाळ फाटलं! मुसळधार पावसामुळे एअरपोर्ट पाण्याखाली, विमानसेवेवर परिणाम; पाहा VIDEO

KBC: विराट कोहलीच्या फ्लाइंग किसवर अमिताभ बच्चन यांचा यॉर्कर; अनुष्का शर्मा क्लीनबोल्ड

Vice president election: काँग्रेसच्या चालीमुळे एनडीएच्या मित्रपक्षासमोर पेच, उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपला चेकमेट

Pre Diabetes : प्री-डायबिटीजची लक्षणे ओळखा; योग्य आहाराने रोखा मधुमेहाचा धोका

SCROLL FOR NEXT