Leg pain while walking cholesterol saam tv
लाईफस्टाईल

Signs of high cholesterol: चालताना 'ही' लक्षणं दिसली तर समजा नसांमध्ये अडकलंय कोलेस्ट्रॉल; शरीरात होणारे बदल वेळीच ओळखा

Leg pain while walking cholesterol: जेव्हा कोलेस्ट्रॉल रक्तातील नसांमध्ये (धमन्यांमध्ये) जमा होऊन त्यांना अरुंद करू लागते, तेव्हा शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा कमी होतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • हाय कोलेस्ट्रॉलला 'सायलेंट किलर' म्हणतात कारण ते लक्षणे न दाखवता धोका निर्माण करते.

  • वाढलेला कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्या अरुंद करतो आणि पायात वेदना, थकवा येऊ शकतो.

  • पायात मुंग्या येणे, थंडी वाटणे, जखमा वेळेत बरा न होणे ही कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे आहेत.

हाय कोलेस्ट्रॉल म्हणजेच हायपरकोलेस्टेरोलिमिया ही अशी समस्या आहे जी अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं न देता शरीरात वाढत असते. म्हणूनच त्याला 'सायलेंट किलर' असंही म्हटलं जातं. पण काही संकेत आपल्याला शरीराच्या हालचालींमध्ये, विशेषतः चालताना, जाणवू शकतात. हे संकेत पेरिफेरल आर्टरी डिजीज (PAD) शी संबंधित असतात. ही एक अशी स्थिती आहे जी वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकते.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर तुम्हाला पायी चालताना काही लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं नेमकी कोणती आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.

पायात वेदना किंवा अस्वस्थता

पायांमध्ये चालताना किंवा जिने चढताना दुखणं हे हाय कोलेस्ट्रॉलचं एक प्राथमिक लक्षण असू शकतं. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि त्यामुळे स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे पायांच्या मांडी, पोटरी किंवा नितंब भागात थकवा, वेदना किंवा अस्वस्थता जाणवते.

स्नायूंमध्ये अशक्तपणा

पायांच्या स्नायूंना योग्य प्रमाणात रक्त न मिळाल्यास अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे चालायला त्रास होणं, तोल जाणं किंवा उभं राहणं कठीण होण्याचाही धोका संभवतो. सततच्या अशा अवस्थेमुळे स्नायूंमध्ये झीज होण्याचा धोका अधिक असतो. वृद्ध किंवा आधीपासूनच इतर आरोग्य समस्या असलेल्या लोकांना याचा धोका अधिक असतो.

पाय किंवा पायाचे बोटं थंड होणं

नसांमध्ये अडथळा आल्यामुळे काही वेळा चालल्यानंतर एक पाय किंवा पायाची बोटं दुसऱ्याच्या तुलनेत अधिक थंड वाटू शकतं. गंभीर अवस्थेमध्ये हा पाय फिकट किंवा निळसर रंगाचा दिसू शकतो. शरीराच्या कोणत्याही भागात सतत थंडी वाटणं हे रक्ताभिसरणाच्या अडथळ्याचं लक्षण असू शकतं.

पायात मुंग्या येणं

शरीराच्या टोकांच्या भागांमध्ये, विशेषतः चालताना, मुंग्या येणं, सुन्नपणा जाणवणं किंवा टोचल्यासारखं वाटणं ही सामान्य लक्षणं असू शकतात. यामागे कारण असतं ते म्हणजे नसांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.

त्वचेचा रंग बदलणं

पायांची त्वचा फिकट किंवा जांभळसर दिसणं हे देखील रक्ताचा योग्य पुरवठा न झाल्याचं लक्षण आहे. ऑक्सिजनयुक्त रक्त त्वचेमध्ये नीट पोहोचत नसेल तर त्वचेला निळसरपणा येतो. याला सायनोसिस म्हणतात.

जखम बऱ्या होण्यासाठी वेळ लागणं

हाय कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात रक्ताभिसरण कमी झाल्यास लहान जखमा बऱ्या होण्यासाठी जास्त वेळ लागतो. पायावर किंवा पंजांवर झालेल्या जखमा वेळेत भरून न आल्यास संसर्ग होऊ शकतो.

हाय कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी कसं कराल?

  • नियमित तपासणी- नियमितपणे कोलेस्ट्रॉल तपासणी करून आपण लवकर निदान करू शकतो आणि वेळेत उपचार सुरू करता येतात.

  • आहारावर नियंत्रण- फळं, भाज्या, संपूर्ण धान्य त्याचप्रमाणे प्रोटीन यांचा समावेश असलेला आहार घ्या. तूप, तळलेले पदार्थ, ट्रान्स फॅट्स यांचं प्रमाण कमी ठेवा.

  • व्यायाम- दररोज चालणं, योग किंवा व्यायाम केल्याने वजन नियंत्रित राहतं आणि हृदय निरोगी राहतो.

  • धूम्रपान टाळा- सिगारेट किंवा तंबाखूचा वापर बंद केल्यास नसांचं आरोग्य सुधारतं आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवता येतं.

हाय कोलेस्ट्रॉलला 'सायलेंट किलर' का म्हणतात?

कारण ते बर्‍याच वेळा कोणतीही लक्षणे न दाखवता शरीरात वाढत असते.

हाय कोलेस्ट्रॉलची पायाशी संबंधित लक्षणे कोणती?

पायात वेदना, थकवा, मुंग्या येणे, थंडी वाटणे, जखमा वेळेत बरा न होणे.

पेरिफेरल आर्टरी डिजीज (PAD) म्हणजे काय?

रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊन रक्तप्रवाह मंदावणे आणि पायात वेदना येणे.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावे?

आहार नियंत्रित ठेवा, व्यायाम करा, धूम्रपान टाळा आणि नियमित तपासणी करा.

कोलेस्ट्रॉल वाढल्याने पायाच्या त्वचेवर काय परिणाम होतो?

पायाची त्वचा फिकट किंवा निळसर दिसू लागते, याला सायनोसिस म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

Ind vs Eng Test : इंग्लंडचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; मँचेस्टर कसोटीच्या २ दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जादुई खेळाडूची ८ वर्षांनी एन्ट्री

Smartphone Repairing Tips: फोन दुरुस्तीला देताय? तर 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Honey Trap: हनीट्रॅपवाले मंत्री कोण? महाजन-लोढांचा फोटो राऊतांकडून ट्वीट

SCROLL FOR NEXT