Chanakya Niti Quotes  Saam Tv
लाईफस्टाईल

तुमच्या या सवयींमुळे तुम्हाला कधीही आदर मिळत नाही, वाचा Chanakya Niti

Human Respect : महान सल्लागार आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्राची रचना केली आहे, ज्यामध्ये त्यांनी मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत

Shraddha Thik

Chanakya Niti On Behaviour :

महान सल्लागार आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्राची रचना केली आहे, ज्यामध्ये त्यांनी मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचे पालन करून तुम्ही कोणत्याही समस्येतून बाहेर पडू शकता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीचा स्वाभिमान ही त्याची सर्वात मोठी संपत्ती असते. व्यक्तीने कोणत्याही पदापेक्षा किंवा प्रतिष्ठेपेक्षा आपला सन्मान मोठा मानला पाहिजे. तसेच, जर तुम्हाला आदर मिळवायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला इतरांनाही आदर (Respect) द्यावा लागेल.

जो व्यक्ती आपल्या पदाचा किंवा प्रतिष्ठेचा अभिमान न बाळगता इतरांचा आदर करतो त्याला समाजात खूप मान मिळतो. मात्र, एखाद्या व्यक्तीमध्ये अशा काही सवयी असतात ज्यांमुळे त्याला समाजात नेहमीच लाज (Shame) वाटते. चला जाणून घेऊया त्या सवयींबद्दल...

माणसाने कधीही खोटे बोलू नये

चाणक्य म्हणतात की जर तुम्ही कोणाशी खोटे बोलून काही फायदा घेतला तर एक दिवस तुमचे खोटे नक्कीच पकडले जाईल आणि तुमची इज्जत कमी होईल. त्यामुळे चुकूनही खोटेपणाचा अवलंब करून कोणतेही काम करू नये.

कोणाबद्दल वाईट बोलू नका

काही लोकांना वाईट बोलायची सवय असते. नेहमी कुणाला तरी वाईट बोलणे. अशा लोकांकडून कोणीही सुख किंवा प्रगती पाहत नाही, म्हणून त्यांच्याबद्दल वाईट बोलून आपण आपले मन शांत करतो. त्यांच्या या सवयीमुळे समाजही त्यांच्याकडे कधी आदराने पाहत नाही.

लोभ

चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने नेहमी मेहनत करून पैसा कमवावा. काही लोक लोभामुळे अनेकदा फसवणूक करून पैसे कमावतात. असा पैसा काही उपयोगाचा नसतो किंवा फार काळ टिकतही नाही.

नेहमी नम्र राहा

चाणक्य नीतीनुसार माणसाचा स्वभाव नेहमी नम्र असावा. नम्र राहणाऱ्या व्यक्तीला समाजात खूप मान मिळतो. तसेच ज्या व्यक्तीच्या स्वभावात नम्रता असते तो यश मिळवण्यास सक्षम असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!

Diabetes : डायबिटीज होण्याआधी शरीर देतं संकेत! सकाळच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको, लगेच तपासा ब्लड शुगर

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT