Kidney Disease
Kidney Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Kidney Disease : 'या' सवयींचा किडनी रुग्णांच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kidney Disease : मूत्रपिंड आपल्या शरीराच्या सर्वात महत्वाच्या भागांपैकी एक आहे. हे लघवीद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. चांगल्या आरोग्यासाठी किडनी निरोगी असणे आवश्यक आहे, अन्यथा संपूर्ण शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. किडनीमध्ये काही त्रास होत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा स्थिती आणखी बिघडू शकते. जाणून घेऊया किडनीला (Kidney) निरोगी (Healthy) ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

अधिक झोपने -

निरोगी राहण्यासाठी भरपूर झोप आवश्यक आहे, परंतु मूत्रपिंडाच्या रुग्णांना सकाळी बराच वेळ झोप घ्यावी लागू शकते. खरं तर, बराच काळ झोपल्यामुळे, जास्त लघवी गोळा केली जाऊ शकते, ज्यामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.

जास्त प्रमाणात मीठाचे सेवन -

मीठामुळे अन्नाची चव वाढते. मीठामध्ये सोडियम असते ज्याचा किडनीवर वाईट परिणाम होतो. तुम्हाला किडनीशी संबंधित काही समस्या असतील, तर मीठाचं सेवन खूप कमी करायला हवं. जास्त मीठ रक्तदाब देखील खराब करू शकते.

दारू प्यायल्याने -

अल्कोहोलचा किडनीवर वाईट परिणाम होतो. दारू प्यायल्यास आणि किडनीचा आजार असेल तर तो ताबडतोब बंद करावा. मद्यपान केल्याने मूत्रपिंडाच्या समस्या वाढू शकतात. म्हणूनच दारू सोडणे गरजेचे आहे.

कमी प्रमाणात पाणी -

किडनी स्वच्छ करण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. भरपूर पाणी प्यायल्याने टाकाऊ पदार्थ जमा होत नाहीत. पाणी कमी प्यायल्यामुळे टाकाऊ पदार्थ किडनीमध्येच जमा होतील आणि किडनीचे नुकसान होऊ शकते.

शरीर सक्रिय न ठेवणे -

काही लोक आजार झाल्यावर फक्त बसून विश्रांती घेतात. किडनीचा त्रास असेल तेव्हा शरीर सक्रिय राहणं गरजेचं आहे. जर तुमच्या किडनीमध्ये काही समस्या असेल तर तुम्ही हलका व्यायाम किंवा योग करू शकता.

उच्च पोटॅशियमयुक्त पदार्थ खाणे -

मूत्रपिंडाच्या रुग्णांनी उच्च पोटॅशियम पदार्थ खाणे टाळावे. किडनीचा त्रास असेल तर बटाटे, गोड बटाटे यांसारख्या गोष्टी खाऊ नयेत. केळी आणि एवोकॅडो खाणे मूत्रपिंडाच्या रूग्णांवर देखील जड असू शकते, कारण या गोष्टींमध्ये पोटॅशियम खूप जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Dixit Net Worth : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण! जाणून घ्या नेटवर्थबद्दल

Narendra Modi: PM मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात येणार, कल्याण अन् दिंडोरीत जंगी सभा घेणार; मुंबईत करणार रोड शो

Rain Alert : मुंबई, ठाण्यासह राज्यातील 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Madhuri Dixit : माधुरीच्या सौंदर्याने 'हे' दिग्गज अभिनेते झाले होते घायाळ, मात्र ती पडली डॉक्टरांच्या प्रेमात

Daily Horoscope: या राशींनी सतर्क राहा, ताण-तणावावर नियंत्रण ठेवा; वाचा आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT