Early signs of lung cancer  saam tv
लाईफस्टाईल

Early signs of lung cancer : फुफ्फुसांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Lung Cancer Symptoms: फुफ्फुसाचा कर्करोग हा जगातील सर्वात गंभीर आणि जीवघेण्या कर्करोगांपैकी एक आहे. अनेकदा याची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसत नाहीत किंवा ती सामान्य आजारांसारखी वाटतात, ज्यामुळे निदानास उशीर होतो

Surabhi Jayashree Jagdish

फुफ्फुसांचा कॅन्सर तेव्हा होतो ज्यावेळी फुफ्फुसांमधील पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढायला लागतात आणि एक प्रकारची कॅन्सरयुक्त गाठ तयार होतो. धूम्रपान, प्रदूषित हवा, काही विषारी रसायनांच्या संपर्कात येणं किंवा अनुवंशिक कारणांमुळे हा आजार होण्याचा धोका अधिक असतो.

हा आजार ‘साइलेंट किलर’सारखा असतो. मुख्य म्हणजे सुरुवातीला तो फारसा लक्षात येत नाही, पण आतून शरीराला हळूहळू पोखरतो. लक्षणं सौम्य असतात, त्यामुळे अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि तोपर्यंत आजार गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असतो. फुफ्फुसांच्या कॅन्सरची नेमकी काय लक्षणं दिसून येतात ती पाहूयात.

सतत खोकला राहणं

जर तुम्हाला खूप दिवसांपासून खोकला आहे आणि तो काही केल्या जात नसेल किंवा अचानक तुमचा आवाज बदलला असेल तर हे फुफ्फुसांमधील गाठ किंवा संसर्गाचे संकेत असू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

श्वास घेण्यास त्रास होणं

जर तुम्हाला जास्त कष्ट न करता श्वास चढत असेल किंवा छातीत जडपणा, दाब किंवा दुखणं जाणवत असेल तर हे फुफ्फुसांच्या क्षमतेत घट झाल्याचं दर्शवतं. याचा अर्थ कॅन्सर शरीरात पसरायला लागला आहे, असंही असू शकतो.

वजन झपाट्याने कमी होणं

कोणतंही डायट किंवा व्यायाम न करता जर अचानक वजन कमी होत असेल आणि हलक्या कामातही अत्यंत थकवा जाणवत असेल, तर हे शरीरात गंभीर काहीतरी सुरू आहे याचे संकेत आहेत.

आवाज बदलणं

जर बोलताना आवाज अचानक भारी वाटत असेल किंवा सतत घरघर होत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की, फुफ्फुसातील ट्यूमरने आवाजाच्या स्नायूंवर किंवा श्वास नलिकांवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट, पुढचे ३ तास धो धो पावसाची शक्यता

Tuesday Astro Remedies: दर मंगळवारी करा 'ही' 5 कामं; हनुमानाच्या कृपेने सर्व गोष्टी घडतील मनासारख्या

Navratri 2025 : नवरात्रीत देवीला दाखवा 'हा' खास नैवेद्य, अननसापासून बनवा युनिक स्वीट डिश

Huma Qureshi Engagement : हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा? होणारा नवरा कोण?

ST Bus : एसटी महामंडळाची नवी योजना, २७ सप्टेंबरपासून होणार सुरू, तिकिट किती?

SCROLL FOR NEXT