Early kidney disease diagnosis saam tv
लाईफस्टाईल

Kidney Disease: किडनीसाठी सायलेंट किलर आहेत हे आजार; शरीराच्या या भागात होणाऱ्या वेदना दुर्लक्ष करू नका

Early Detection Of Kidney Disease: किडनी हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचं अवयव आहे. रक्त शुद्ध करणं, शरीरातील पाणी व मीठ यांचं संतुलन राखणं आणि विषारी पदार्थ बाहेर टाकणे ही त्यांची मुख्य कामं आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी ही शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनीचा आकार हा बीनसारखा असतो. किडनीचं काम हे रक्तातील अशुद्धता आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करणं आणि ते लघवीच्या स्वरूपात बाहेर टाकणं आहे. याशिवाय हार्मोन्ससाठीही किडनी खूप महत्त्वाचा अवयव आहे.

एक्सपर्ट्सचं म्हणणं काय?

तज्ज्ञांच्या मते, किडनीच्या आजाराला अनेकदा सायलेंट किलर म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणं दिसून येत नाहीत. डायबेटीज आणि हाय ब्लड प्रेशर ही किडनीचं नुकसान होण्यामागे सर्वात सामान्य कारणं आहेत. सुरुवातीच्या काळात किडनी खराब झाल्यानंतर कोणत्याही वेदना होत नाही. त्यामुळे तुम्हाला काही चाचण्या कराव्या लागू शकतात.

युरीन टेस्ट करणं गरजेचं

मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी नियमित रक्त आणि युरीन टेस्ट करून घेतली पाहिजे. तुम्हाला जरी फीट वाटत असाल तरीही तुम्ही ही टेस्ट केली पाहिजे. किडनी स्टोन, संसर्ग किंवा ट्यूमरसारख्या परिस्थितीत वेदना होऊ शकतात.

शरीरातील या भागांमध्ये होतात वेदना

कधीकधी शरीराच्या इतर भागातही किडनीचा त्रास जाणवतो. ज्याला वैद्यकीय भाषेत रेफर्ड पेन असं म्हणतात. ज्यावेळी किडनी स्टोन किंवा ट्यूमरमुळे यूरेटर अडथळा येतो तेव्हा तीव्र वेदना पाठीपासून सुरू होऊ शकतात. या वेदना अनेकदा ओटीपोटात, मांडी किंवा गुप्तांगात पसरू शकतात.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

किडनीशी संबंधित वेदना बहुतेकदा पाठीच्या खालच्या भागात जाणवतात. अनेकदा लोकं याकडे मसल पेन म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र या वेदना बराच काळ राहत असतील तर काळजी घेतली पाहिजे. ही पोटदुखी हे किडनीचं इन्फेक्शन किंवा एब्सेसचं लक्षण देखील असू शकतं.

किडनी निकामी झाल्यास हृदयाभोवती सूज येऊ शकते. ज्यामुळे छातीत दुखण्याचा त्रासही जाणवू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये, वेदना, जळजळ किंवा पायांमध्ये सूज येणं हे देखील किडनी निकामी होण्याचं लक्षण असू शकतं.

तज्ज्ञांनी सांगितलं की, सुरुवातीच्या काळात किडनीच्या आजारामुळे सहसा वेदना होत नाहीत. ज्यावेळी वेदना दिसून येतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष हलके घेऊ नका. किडनीच्या आजाराचा धोका असलेल्या लोकांनी वेदना होण्याची वाट पाहण्याऐवजी नियमित तपासणी करून घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT