Colon Cancer symptoms saam tv
लाईफस्टाईल

Colon Cancer: सकाळी सकाळी दिसून येतात आतड्यांच्या कॅन्सरची 'ही' प्रमुख लक्षणं; टॉयलेटला गेल्यावर याकडे दुर्लक्ष करू नका!

Colon Cancer symptoms: दैनंदिन जीवनात अनुभवल्या जाणाऱ्या काही आरोग्याच्या समस्या कोलन कॅन्सरशी संबंधित असू शकतात. काही लक्षणं आहेत जी सकाळी किंवा वॉशरूमला गेल्यानंतर दिसू शकतात. ही लक्षणं कोणती आहेत ती पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी नाहीये. कॅन्सरमध्ये अजून एक कॅन्सर आहे तो म्हणजे आतड्याचा कॅन्सर. ज्याला कोलन कॅन्सर असेही म्हणतात, हा जगभरातील तिसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी आढळून येणाऱ्या कॅन्सरच्या 10 टक्के प्रकरणं ही कोलन कॅन्सरची असतात.

लोकांमध्ये कोलन कॅन्सरबद्दल फारशी जागरूकता नाही. मुळात दैनंदिन जीवनात अनुभवल्या जाणाऱ्या काही आरोग्याच्या समस्या कोलन कॅन्सरशी संबंधित असू शकतात. कोलन कॅन्सरची काही लक्षणं किरकोळ आणि सामान्य असतात की लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. काही लक्षणं आहेत जी सकाळी किंवा वॉशरूमला गेल्यानंतर दिसू शकतात. ही लक्षणं कोणती आहेत ती पाहूयात.

पोटात अनेक लहान अवयव असतात जे पोट आणि पचनसंस्थेशी जोडलेले असतात. पचनसंस्थेच्या शेवटच्या भागात किंवा कोलनमध्ये होणारा कॅन्सर ही एक गंभीर समस्या आहे. या आजारामुळे शरीरात विविध प्रकारचे बदल दिसून येऊ शकतात. सकाळी अनेक प्रक्रियांवरही कोलन कॅन्सरचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोलन कॅन्सरमध्ये रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात.

सकाळच्या वेळी दिसून येणारी लक्षणं

बद्धकोष्ठता

चुकीच्या आहारामुळे लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. परंतु आतड्यांसंबंधी कॅन्सरमुळे देखील बद्धकोष्ठता उद्भवू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

शौचातून रक्तस्राव होणं

जर तुम्हाला सकाळी शौचातून रक्तस्राव होत असेल तर ते कोलन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे रक्ताच्या गुठळ्या तयार होणं आणि पोट व्यवस्थित साफ न होणं हे देखील कोलन कॅन्सरचं कारण असू शकतं.

क्रॅम्प्स येणं

सकाळी पोटात दुखणे आणि क्रॅम्प्स येणं हे देखील कोलन कॅन्सरचे प्रमुख लक्षण मानलं जातं. जर तुम्ही सकाळी पोटदुखीने उठत असाल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT