Bad Cholesterol saam tv
लाईफस्टाईल

Bad Cholesterol: हार्ट अटॅकचा धोका कमी करतील हे 5 ड्रिंक्स; नसांमध्ये जमा झालेली चरबी काही दिवसांत वितळेल

Drinks To Lower Cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. ग्रीन टी, डाळिंबाचा रस, सोया मिल्क, टोमॅटोचा रस आणि बीटाचा ज्यूस यांचा संतुलित आहारात समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या काळात हार्ट अटॅकचा वाढताना दिसतोय. यामागे वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे एक महत्त्वाचं कारण आहे. आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त झालंय तर त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

मात्र कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहून चालत नाही. त्यासोबतच खाण्यापिण्याच्या सवयी आणि रोजच्या जीवनशैलीत बदल करणंही महत्त्वाचं आहे. संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम करणं, पुरेशी झोप घेणं आणि ताण कमी ठेवणं यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.

हेल्थलाइनच्या माहितीनुसार, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वप्रथम आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ट्रान्स फॅट असलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड आणि रिफाइंड साखरेचं प्रमाण कमी करावं. अशा पदार्थांचे जास्त सेवन केल्याने शरीरातील चरबीचं प्रमाण आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं.

काही ड्रिंक्स हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. योग्य आहार आणि नियमित व्यायामासोबत या पेयांचा समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. यामध्ये कोणत्या ५ ड्रिंक्सचा समावेश तुम्ही करू शकता ते पाहूयात.

ग्रीन टी पिण्याचे फायदे

ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालानुसार, ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. हे घटक शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात. ग्रीन टीच्या सेवनामुळे बॅड कोलेस्ट्रॉल आणि एकूण कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात थोडी घट होण्यास मदत होऊ शकते.

डाळिंबाचा ज्यूस

डाळिंबाचा रस अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हे घटक शरीरातील पेशींचं नुकसान कमी करण्यास मदत करतात. डाळिंबाच्या रसामुळे रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होऊ शकते. मात्र या रसात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे तो मर्यादित प्रमाणात पिणं योग्य आहे.

सोया मिल्क

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सोया मिल्कचाही आहारात समावेश करता येतो. सोया मिल्क हे वनस्पतींपासून मिळणाऱ्या प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. प्रोटीन शरीरासाठी आवश्यक असतात. तसंच संतुलित आहाराचा भाग म्हणून सोयापासून तयार केलेले पदार्थ खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊ शकते.

टोमॅटोचा रस

टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचा अँटिऑक्सिडंट असतो. हा घटक शरीराचे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होणारं नुकसान कमी करण्यास मदत करू शकतो. टोमॅटोचा रस संतुलित आहाराचा भाग म्हणून घेतल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो. टोमॅटोचा रस पिताना त्यात जास्त मीठ घालणं टाळावं. कमी मिठाचा किंवा मीठ न घातलेला टोमॅटोचा रस हा चांगला पर्याय ठरतो.

बीटचा ज्यूस

बीटमध्ये अनेक उपयुक्त घटक असतात. त्यात नायट्रेट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. बीटाचा ज्यूस संतुलित आहाराचा भाग म्हणून घेता येतो. कमी मीठ असलेला हा ज्यूस हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBI Action: ईडीच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडलं

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा! आरोपींना मिळत होते तपासाचे धागेदोरे, कोण पुरवत होतं अपडेट्स?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये पाणी मिळत नसल्याने तरुण संतप्त, अहमदपूर नगराध्यक्ष कार्यालयात तोडफोड

Diwali Karanji Recipe : खुसखुशीत करंजी बनवण्याची सोपी रेसिपी, दिवाळी फराळाची वाढेल रंगत

Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई! दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT