Chanakya Niti On Success Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Success : 'खरं हे नेहमी सोन्यासारखं चकाकत' ! यशस्वी होण्यासाठी चाणक्यांनी दिला मूलमंत्र

Success Mantra : काहीच जण हे वेळ व आपली गरज बघून खोटं बोलतात तर काही लोक हे स्वत:च्या फायद्यासाठी खोटं बोलतात.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti : चाणक्य सांगतात की, अशी कोणतीचं व्यक्ती नसेल जिने आयुष्यात स्वत:साठी कधी खोटं बोलाच नसेल. त्यातील काहीच जण हे वेळ व आपली गरज बघून खोटं बोलतात तर काही लोक हे स्वत:च्या फायद्यासाठी खोटं बोलतात.

शेवटी काय तर खोट्याच्या सहाय्याने माणूस कधीच जिंकू शकत नाही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्ही समोरच्याला फसवून तुमचे काम करुनही घ्याल परंतु, तुम्हाला पुन्हा आयुष्यात (Life) त्या व्यक्तीकडून कधीच मदत मिळणार नाही. चाणक्यांनी सांगितलं जर यशस्वी व्हायचं आहे तर खोट्याची संगत नकोच. तसेच यश (Success) सतत आपल्या पदरी हवं असेल तर त्याचे मूलमंत्र जाणून घेऊया

1. एखाद्या व्यक्तीला त्याच्या शत्रूकडून ज्या प्रकारे नुकसान होते, त्याहूनही जास्त नुकसान त्याला खोटे बोलण्याने होते. खऱ्या माणसाला (Human) कोणीही मोडू शकत नाही.

2. खोट्याचा आधार घेणारा आणि देणारा या दोघांच्याही यशात अडथळे येतात. त्यासाठी खोटे बोलताना १०० वेळा विचार करायला हवा.

3. जी व्यक्ती स्वत:शी खोटं बोलते परंतु, तिला त्याचा पश्चाताप देखील होत नाही. अशा व्यक्तींना आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

4. खोटे लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटे बोलण्यापेक्षा एकदा खरे बोलणे चांगले. खोटं बोलून कुणाला दुखवणं आपल्या यशाच्या मार्गात अडथळे आणतात.

5. जो माणूस खरा असतो आणि कधीही खोटे बोलत नाही, त्याचा आत्मविश्वास नेहमीच वाढतो. ते कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाहीत आणि खंबीरपणे सामोरे जातात. त्यांना यश मिळणे सोपे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Politics: ...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही, शरद पवार गटाच्या नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

Tmkoc Show: जेठालालचं भांडण पेटलं, निर्मात्याची पकडली कॉलर नंतर दिली शो सोडण्याची धमकी

BJP-Congress Rada : काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, जोरदार हाणामारी अन् खुर्च्या फेकल्या

SCROLL FOR NEXT