Sunday che Upay saam tv
लाईफस्टाईल

Ravivar Upay: कुटुंबातील व्यक्तींचं आरोग्य राहील एकदम ठणठणीत; रविवारच्या दिवशी करा फक्त हे उपाय

Sunday remedies for health: रविवार हा दिवस सूर्यदेवतेला समर्पित असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो आणि तो आरोग्य, ऊर्जा, तेज, पिता आणि आत्मविश्वाचा कारक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो आणि त्यादिवशी केलेले उपाय आरोग्य, यश आणि घरातील शांततेसाठी फायदेशीर असतात.

  • रविवारी सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन गूळ खाणे हा एक शुभ आणि आरोग्यदायी उपाय आहे.

  • रविवारचा उपवास करून फक्त फळे, दूध किंवा पाणी घेणे सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे.

सनातन धर्मात प्रत्येक दिवस हा एखाद्या देवतेला समर्पित मानला जातो. त्यात रविवारचा दिवस हा विशेषतः सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी सूर्यदेवाची पूजा, व्रत आणि काही विशेष उपाय केल्यास आरोग्य, यश, आत्मबल आणि घरातील तणाव दूर होण्यास मदत होते.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रविवारच्या दिवशी असे काही उपाय आहेत, जे केल्याने तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचं आरोग्य चांगलं राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया रविवारच्या काही प्रभावी उपायांबद्दल.

रविवारच्या दिवशी गूळ खाण्याचा उपाय

रविवारी सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर गूळ खाणं हा एक अतिशय शुभ मानला गेलेला उपाय आहे. गूळ हे केवळ गोड पदार्थ नाही, तर ते आरोग्यासाठी गुणकारी मानलं जातं. जर तुम्ही गोड पदार्थ टाळत असाल तरी एक छोटासा तुकडा गूळ खाणं सुद्धा फायदेशीर ठरतं.

रविवारचं व्रत आणि नियम

सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी रविवारी उपवास करणं हा एक प्रभावी मार्ग आहे. या दिवशी फक्त फळं, दूध किंवा पाणी घेऊन उपवास करावा. सूर्यास्त होईपर्यंत मीठ खाणं टाळावं. सकाळी सूर्य उगवल्यानंतर त्यांना पाण्याने अर्घ्य द्या, त्यांचं पूजन करा आणि मंत्रोच्चाराने त्यांच्या कृपेची प्रार्थना करा.

लाल चंदनाचा टिळा लावा

रविवारच्या दिवशी पूजेनंतर कपाळावर लाल चंदनाचा टिळा लावणं हा देखील एक अत्यंत शुभ मानला जातो. घरातील प्रत्येकाने हा टिळा लावल्यास सूर्यदेवाची कृपा संपूर्ण कुटुंबावर होते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मनःशांती मिळते आणि मान-सन्मान वाढतो.

ईशान्य कोपऱ्याचा प्रभाव

रविवारी जर तुम्ही उत्तर-पूर्व दिशेला म्हणजेच ईशान कोनात बसून अभ्यास, योजना किंवा महत्त्वाचं निर्णय घेण्याचं काम केलं, तर त्याचा अधिक चांगला परिणाम मिळतो. यामागचं कारण म्हणजे या दिशेचा अधिपती सूर्यदेव आहेत. या दिशेने माणसाच्या बुद्धीला आणि निर्णयक्षमता वाढवण्याचं काम होतं.

रविवारचा दिवस कोणासाठी महत्त्वाचा मानला जातो?

रविवारचा दिवस सूर्यदेवासाठी महत्त्वाचा मानला जातो.

रविवारी गूळ का खावा?

रविवारी गूळ खाणे हे आरोग्यासाठी चांगले आणि सूर्यदेवाला शुभ मानले जाते.

रविवारी उपवास करताना काय खाऊ शकतो?

फळे, दूध किंवा पाणी घेऊन उपवास करता येतो.

लाल चंदनाचा टिळा का लावावा?

सूर्यदेवाची कृपा मिळावी आणि घरात सकारात्मक ऊर्जा यावी म्हणून टिळा लावावा.

ईशान्य दिशेत कोणती कामे करावीत?

अभ्यास, योजना आणि महत्त्वाचे निर्णय घेणे ईशान्य दिशेत करावेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळी बोनस जाहीर; खात्यात येणार इतके पैसे

Flight Fare Hike : विमान प्रवास महागला, दिवाळीपूर्वी तिकिटाच्या दरात ४ पटीने वाढ, प्रवासासाठी किती मोजावे लागणार?

Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Maharashtra News Live Update: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT