Gudi Padwa Rashi Bhavishy 2023
Gudi Padwa Rashi Bhavishy 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Gudi Padwa Rashi Bhavishy 2023 : गजकेसरी योगाने सुरु होतोय यंदाचा गुढीपाडवा, 'या' 3 राशी ठरतील लकी !

कोमल दामुद्रे

Gudi Padwa 2023 : हिंदू धर्मात गुढीपाडव्याला अधिक महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

हिंदू नववर्ष म्हणजेच विक्रम संवत 2080 चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होईल. यंदा हा गुढीपाडवा 22 मार्चला आहे, या नवीन वर्षात अनेक राजयोग तयार होत आहेत. 22 मार्चच्या राशीभविष्यानुसार सकाळी 5 वाजता शनि आणि गुरू आपापल्या राशीमध्ये विराजमान होणार आहे. मंगळ आणि शनीचा केतू या दोघांसोबत असल्यामुळे नवपंचम राजयोग तयार होतो. मंगळ केतू एकमेकांपासून पाचव्या आणि नवव्या घरात बसल्याने देखील शुभ आहे.

मीन राशीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुध आदित्य योग तयार होतो, तर गजकेसरी योग चंद्र आणि गुरूच्या संयोगाने तयार होतो. राहू देखील पॉवर हाऊसमध्ये बसून योगांचे शुभफळ वाढवत आहे, तर अध्यात्माचा कारक केतू नवव्या घरात बसला आहे. बुधवारपासून नवीन वर्ष सुरू होत असून बुध बलवान आहे. अशा परिस्थितीत 3 राशीच्या (Zodiac) लोकांसाठी हे वर्ष खूप शुभ असणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 राशी.

1. वृषभ -

Taurus

या राशीच्या लोकांसाठी यावेळी ग्रहांचे एकत्रिकरण खूपच शुभ मानले जात आहे. हा योग कुंडलीतील अकराव्या घरात मजबूत असल्याने गजकेसरी योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीतील लोकांना या वर्षी आर्थिक समृद्धी मिळणार आहे. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा दिवस खूप चांगला आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या कामात पूर्ण यश मिळेल. तुमच्या कुटुंबातील सदस्य तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील आणि तुम्ही नवीन घर (Home) देखील घेऊ शकता शकता. शनिदेवाच्या कृपेने कामाच्या ठिकाणी तुमची किर्ती उंचावत राहील.

2. तूळ -

Libra

या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची (New Year) सुरुवात चांगली होणार आहे. यावेळी शनि पाचव्या भावात विराजमान आहे आणि मंगळ नवव्या घरात बसून तुमचे भाग्य वाढवत आहे. सहाव्या भावात प्रबळ राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे तुमच्या शत्रूंचा नाश होईल. यावेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तसेच वडिलांच्या सहकार्याने यश मिळेल. उच्च शिक्षण क्षेत्रातील अडथळा दूर होईल. भावा-बहिणीच्या नात्यात आलेला तणावही दूर होईल अशी अपेक्षा आहे.

3. मीन -

Pisces

या राशीच्या लोकांसाठी बुध आदित्य योग, गजकेसरी योग लग्नातच बनतो. त्याच्या प्रभावाने तुमचा स्वाभिमान वाढेल. यावेळी तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ शुभ आहे. हा राजयोग तुमच्या वैवाहिक जीवनासाठीही खूप शुभ असणार आहे. शिक्षक, लेखक आणि अभ्यासाशी संबंधित लोकांना प्रसिद्धी मिळेल. हे वर्ष तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठीही खूप शुभ असणार आहे. जे लोक गूढ शास्त्रात रुची घेत आहेत त्यांना या वर्षी शुभ परिणाम मिळतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT