अटलांटिक महासागरामध्ये एक मोठी घटना घडली आहे. ही घटना म्हणजे अटलांटिक महासागराच्या भागात तापमानात घट झाली आहे. या घटनेमुळे शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहेत. मुळात एक थंड भाग विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे पसरलेला आहे. 40 वर्षांहून अधिक वेळ हा भाग सर्वात उष्ण राहिल्यानंतर जूनच्या सुरुवातीला थंड होऊ लागला. या प्रदेशातील अचानक निर्माण झालेल्या थंडीमुळे शास्त्रज्ञांसमोर अनेक प्रश्न निर्माण झालेत.
फ्लोरिडामधील मियामी विद्यापीठातील डॉक्टरेट रिसर्च असोसिएट फ्रांझ तुचेन यांनी सांगितलं की, अटलांटिक महासागराचा हा प्रदेश गेल्या काही वर्षांत थंड आणि उष्ण अशा दोन्ही परिस्थित आहे. मात्र ज्या पद्धतीने या प्रदेशाचं उष्णतेपासून थंडीत रूपांतर झालं ते खूपच आश्चर्यकारक होतं. दरम्यान या प्रदेशात नेमकं काय घडतंय याबाबत शास्त्रज्ज्ञांनाही कल्पना नाहीये.
नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) वरिष्ठ शास्त्रज्ञ मायकेल मॅकफॅडन म्हणाले की, हा थंड भाग एक तात्पुरते वैशिष्ट्य असू शकतं, ज्यामुळे आम्ही शास्त्रज्ञ अद्याप पूर्णपणे समजू शकलेलो नाहीत. या घटनेने सर्व वैज्ञानिक देखील गोंधळलेले असून कारण समजून घेण्यासाठी तपास करत आहोत.
या वर्षी जूनमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात अचानक घसरण सुरू झाली आणि त्यानंतर ही थंडी सुरू झाली. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पूर्व विषुववृत्तीय अटलांटिकमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 86 °F (30 °C) पेक्षा जास्त असल्याचं समोर आलं होतं. हे तापमान 1982 नंतरचं सर्वाधिक असल्याची नोंदही करण्यात आली. मात्र जूनमध्ये तापमानात अचानक घट झाली, जुलै अखेरीस ते 77 °F (25 °C) पर्यंत पोहोचलं होतं.
काही शास्त्रज्ञांच्या मते, ही थंड होण्याची घटना "Atlantic Niña" नावाच्या हवामान पद्धतीचं लक्षण असू शकते. अटलांटिक निनाच्या प्रभावामुळे पश्चिम आफ्रिकेत मुसळधार पाऊस पडतो आणि गिनीच्या आखाताजवळील देशांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.
मात्र नुकत्यात गेल्या काही आठवड्यामध्ये अटलांटिक महासागराचं थंड पाणी पुन्हा गरम होऊ लागलंय. ज्यामुळे हे अटलांटिक निना म्हणून वर्गीकृत केलं जाऊ शकत नाही. शास्त्रज्ञ या घटनेची संपूर्ण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करतायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.