Mobiles: 'टेक्नो'चा 5G झाला लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये - Saam TV
लाईफस्टाईल

Mobiles: 'टेक्नो'चा 5G झाला लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

टेक्नोचा पहिला ५ जी स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचे नाव 'टेक्नो पावा ५ जी' आहे. यात ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासहीत ट्रीपल रिअर कॅमेऱ्याच्या सेटअपची सुविधा आहे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : टेक्नोचा पहिला ५ जी स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचे नाव 'टेक्नो पावा ५ जी' आहे. यात ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासहीत ट्रीपल रिअर कॅमेऱ्याच्या सेटअपची सुविधा आहे. ६ हजार एमएएचची बॅटरी आहे. याच्या मदतीने ३२ दिवसांपर्यंतचे स्टँडबाय आणि १८३ तासांचे म्युझिक प्लेबॅक मिळते. (Techno Pova 5G Phone launched in India)

भारतात (India) टेक्नो पावा ५ जीची किंमत १९,९९९ रुपये इतकी आहे. यात ८ जीबी अधिक १२८ जीबी रॅम व स्टोरेज ऑप्शनची सुविधा आहे. इथर ब्लॅक कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होऊ शकतो. १४ फेब्रुवारीपासून अॅमेझॉनवर हा मोबाईल फोन (Mobile Phone) विक्रीस उपलब्ध असेल. फोन खरेदी करणाऱ्या पहिल्या दीड हजार ग्राहकांना १,९९९ रुपयांची सूट कंपनीकडून दिली जात आहे.

टेक्नो पावा ५ जीची वैशिष्टे

- हा स्मार्टफोन अँड्रॉईड ११ आणि एचआयओएस ८.० वर चालतो. यात ६.९ फुल्ल एचडी डिस्प्ले आहे.
- टेक्नो पावा मीडियाटेक डायमेंशन ९०० एसओसीवर चालतो. ज्याला ८ जीबी रॅमसोबत जोडले गेले आहे.
- यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच एक सेकंडरी आणि एक टर्शियरी कॅमेरा आहे. तसेच, क्वाड फ्लॅश आहे.
- यात १२८ जीबीची इनबिल्ट स्टोरेज मेमरी आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Nakshatra Gochar: २८ नोव्हेंबर रोजी गुरु बदलणार नक्षत्र; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Romantic Places In Mumbai: मुंबईतील 'हे' रोमँटिक ठिकाण जेथे वाहतात प्रेमारे वारे

Ajit Pawar News : बारामतीत काका-पुतण्यात पुन्हा जुंपली, पाहा Video

IPL 2025 Auction: 13 ते 42...कोण आहे IPL लिलावात नाव नोंदवणारे सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडू?

Health Tips: हिवाळ्यात मधुमेहावर 'ही' फळे, भाज्या गुणकारी

SCROLL FOR NEXT