Teachers Day Special Saam Tv
लाईफस्टाईल

Teacher's Day Special : सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका, पाहा कसा होता त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास

Teachers Day 2023 : 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

Shraddha Thik

First Female Teacher :

5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्र उभारणीत शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. शिक्षक दिन साजरा करण्यामागचे कारण कृतज्ञता व्यक्त करणे आणि देशातील शिक्षकांचे योगदान आणि प्रशंसनीय प्रयत्नांबद्दल त्यांचा सन्मान करणे हे देखील आहे. शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना समर्पित केले आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते तसेच त्यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी झाला. सर्वपल्ली राधाकृष्णन हे उच्च दर्जाचे शिक्षक म्हणून गणले जातात.

ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली. पण तुम्हाला माहित आहे का की मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे श्रेय एका महिला शिक्षिकेला जाते. ही महिला देशाची पहिली शिक्षिका (Teacher) मानली जाते. चला जाणून घेऊया देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, ज्यांनी मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

चरित्र

दलितांबद्दलच्या भेदभावाचा तो काळ आणि अशातच त्या काळी मुलिंना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना अजिबात शिकण्याची परवानगी नव्हती. अशा काळात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाकडे वाटचाल केली.

त्यांना एकदा कुठूनतरी इंग्रजी पुस्तक मिळाले. सावित्रीबाईंच्या हातातलं पुस्तक वडिलांनी पाहिल्यावर त्यांनी ते हिसकावलं आणि फेकून दिलं. त्यांच्या वडिलांनी स्पष्ट केले की केवळ उच्च जातीतील पुरुषांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. दलित आणि विशेषत: महिलांना शिक्षण घेऊ दिले जात नाही.

शिक्षण

वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा जोतिराव फुले यांच्याशी विवाह (Marriage) झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाई फुले निरक्षर होत्या आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले तिसरीत शिकत होते. सावित्रीबाईंनी पतीसमोर शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा ज्योतिराव फुले यांनी त्यांना लगेचच परवानगी दिली आणि शिक्षणासाठी शाळेत पाठवले.

त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली. त्यांच्यावर कचरा आणि चिखल फेकण्यात आला पण त्यांनी हार मानली नाही आणि शाळेत जात राहिला.

पहिली मुलींची शाळा

उलट माझ्यासारख्या सर्व मुलींना शिक्षणाच्या वाटेवर नेण्याची चालना त्यांना आली. आणि ही प्रेरणा घेऊन त्यांनी मार्ग खुला केला. मुलींना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागू नये, असा विचार करून सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुणे, महाराष्ट्र येथे देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली.

एकामागून एक सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी 18 शाळा बांधल्या. अशा त्या पहिल्या महिला (Women) शिक्षिका बनल्या. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिकाही होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या वयाच्या 66 व्या वर्षी 10 मार्च 1889 रोजी निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

७५ वर्षीय वृद्धेचे अब्रुचे लचके तोडले, झोपडपट्टीत घुसून तरूणाकडून जबरदस्ती, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

Amruta Khanvilkar: अमृताच्या सौंदर्याने केलाय कहर; PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT