Chanakya Niti For Motivation : स्वतःच्या आयुष्याचा बॉस बनण्यासाठी चाणक्यांचे हे सोनेरी नियम लक्षात ठेवा, वाचा सविस्तर

How To Become Self Boss : आचार्य चाणक्य यांनी जीवनात आनंदी, समृद्ध आणि यशस्वी होण्यासाठी काही सुवर्ण नियम दिले आहेत, जे आजच्या जगात उपयोगी पडतात.
Chanakya Niti For Motivation
Chanakya Niti For MotivationSaam Tv
Published On

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य यांनी जीवनात आनंदी, समृद्ध आणि यशस्वी होण्यासाठी काही सुवर्ण नियम दिले आहेत, जे आजच्या जगात उपयोगी पडतात. तुम्हालाही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल किंवा प्रत्येकाने तुम्हाला आवडावे, दररोज प्रगती करावी यासाठी आधी तुम्ही स्वतःच स्वत:चे बॉस व्हा. असे करण्यासाठी चाणक्यांचे हे सोनेरी नियम लक्षात ठेवा.

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सांगितले आहे की काही सुवर्ण नियमांचे पालन करून तुम्ही तुमचे स्वप्न (Dream) साकारू शकता जे आडच्या घडिला सपर्वच पाहतात. नोकरी, यशस्वी व्यवसाय, प्रेम, लग्न, घर किंवा सत्ता हे सर्व प्राप्त करण्यासाठी हे नीतिनियम जे प्रत्येकाने त्यांच्या आयूष्यात अंगीकारले पाहिजेत.

Chanakya Niti For Motivation
Chanakya Niti On Emotional Women : रडणाऱ्या स्त्रियांमुळे घराचं भाग्य उजळेल, कसं? जाणुन घ्या

इतरांच्या चुकांमधून शिका -

आचार्य चाणक्य म्हणतात की स्वतःच्या चुकांमधून शिकल्याने तुमचे आयुष्य कमी होईल. म्हणूनच इतरांच्या चुकांमधून शिकणे शहाणपणाचे आहे. पण आपल्याला स्वतःच्या हाताला जाळण्याची सवय आहे आणि आपण अनेकदा या धड्याकडे दुर्लक्ष करून स्वतःलाच दुखावतो.

जास्त प्रामाणिकपणा योग्य नाही -

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) म्हणतात की प्रामाणिकपणा ही चांगली गोष्ट आहे, परंतु जास्त प्रामाणिकपणा योग्य नाही. कारण फक्त सरळ झाडे आणि सरळ माणसेच आधी कापली जातात. आजकाल चटकन बुद्धीचा जास्त आदर आहे, अशा स्थितीत जिथे गरज आहे तिथे प्रामाणिकपणा दाखवा, नेहमी सरळ किंवा गप्प राहणे योग्य नाही. अशा लोकांचा कोणी आदर करत नाही किंवा अशा लोकांकडे लक्ष दिले जात नाही.

Chanakya Niti For Motivation
Chanakya Niti For Life : घरामध्ये घडणाऱ्या या संकेतांना दुर्लक्ष करू नका, अन्यथा...

स्वार्थ आणि नाते -

आचार्य चाणक्य म्हणतात की जगातील प्रत्येक नाते (Relationship) हे स्वार्थी असते. म्हणून, स्वार्थी संबंधांमध्ये जास्त वेळ वाया घालवू नका आणि फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जर इतरांनी स्वार्थापोटी तुमच्याशी काही केले तर तुम्हीही तेच करू शकता. पण दिनचर्या लक्षात ठेवून ते करा.

कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी -

आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वतःलाच विचारा मी हे काम का करत आहे? त्याचा परिणाम सकारात्मक असेल आणि मी यशस्वी होईल का? असे केल्याने, तुम्ही सुरुवातीला निराश होऊ शकता. पण नंतर लवकरच किंवा नंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com