Teachers Day 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Teacher's Day 2023 : तुम्हालाही मुलांचे फेव्हरेट शिक्षक व्हायचंय? 'तारे जमीन पर' मधल्या 'निकुंभ सरांसारखे हे गुण जोपासा

Teacher's Day Special : विद्यार्थी रोपांसारखे आहेत, शाळा बागेसारखी आहे आणि शिक्षक बागायतदार आहेत.

Shraddha Thik

Happy Teacher's Day :

विद्यार्थी रोपांसारखे आहेत, शाळा बागेसारखी आहे आणि शिक्षक बागायतदार आहेत. हे अस असेल तर शिकण्या-शिकवण्याचं वातावरण फारच सुंदर होईल. खरे तर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात मैत्रीपूर्ण नाते निर्माण झाले की शिकणे आणि शिकवणे हे खेळ खेळल्या सारखेच होऊ शकते.

आजकाल अ‍ॅक्टिव्हिटीज करून शिकण्यावर अधिक भर दिला जात आहे; नव्या पिढीसाठी हे चांगले लक्षण (Symptoms) आहे. ताणतणावात अभ्यासाचा काही उपयोग होत नाही.नुसत रट्टा वाचन हे मुलांच्या भविष्यासाठी चांगले मानले जात नाही. तसेच एक चांगला शिक्षक अपशब्द न वापरता मुलांना समजून जेऊन त्यांना कळेल अशा भाषेत जास्त समजावतो. मानव सभ्यता सुसंस्कृत बनवण्यात शिक्षक नेहमीच पुढे राहिले आहेत.

शिक्षण, शिक्षक (Teacher) आणि विद्यार्थी यांवर अनेक चित्रपट (Movie) बनले आहेत, तरी 'तारे जमीन पर' काही वेगळाच ठरतो. या चित्रपटाने शिक्षकांसाठी एक आदर्श ठेवला आहे; ज्या आदर्शावर सर्वच शिक्षकांनी चालले पाहिजे. या चित्रपटात असलेले 'निकुंभ सर' हे मुलांना खेळण्यातून शिकवताना दिसतात. डिस्लेक्सियाने ग्रस्त असलेल्या 'इशान'ला शिकण्यात खूप अडचणी येतात पण निकुंभ सरांच्या सर्जनशील प्रयत्नांमुळे तो शिक्षणात पारंगत होतो. तसेच एक चांगला शिक्षक एका विद्यार्थ्याला बौद्धिकदृष्ट्या परिपूर्ण बनवतो. वेगवेगळ्या पद्धतींद्वारे पाठ्यपुस्तकातील ज्ञान विद्यार्थ्यांना देता येते. असा संदेश निकुंभ सर देतात.

अलीकडच्या काळात, 'तारे जमीन पर'चे निकुंभ सर सारखे अनेक शिक्षक आहेत. जागतिक शिक्षक पुरस्काराने सन्मानित रणजितसिंह डिसले सर, तसेच भौतिकशास्त्र वाला म्हणून प्रसिद्ध असलेले अलख पांडे सर, सुपर थर्टीचे आनंद कुमार सर हे असे शिक्षक आहेत जे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणत आहेत. जर तुम्ही एखाद्याचे आयुष्य सुधारत असाल तर यापेक्षा मोठे माणुसकीचे कृत्य काय असू शकते? भारत आज जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावत असेल तर त्यात भारतीय शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकांचेही योगदान आहे.v

शिक्षक या नात्याने मुलांना ज्या पद्धतीने शिकायचे आहे तसे शिकवले पाहिजे. मुलांना मोकळेपणाने बोलू देणे हे चांगल्या शिक्षकांचे लक्षण आहे. मुलांमध्ये जिज्ञासा फुलू दिली पाहिजे. एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याला चुका कमी करण्यासाठी म्हणून फटकारतो आणि अधिक समजावून सांगतो. मुलं चुकांमधूनही शिकतात आणि शिकवणं हाच शिक्षकांचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे बदल घडवून आणण्याची जबाबदारी असणारे सर्व शिक्षक कमी-अधिक प्रमाणात 'निकुंभ सरांची' भूमिका बजावत आहेचत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT