Tata Motors Scrapping Centre Saam tv
लाईफस्टाईल

Tata Motors Scrapping Centre: टाटा मोटर्सचं पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचं पाऊल, भुवनेश्वरमध्ये उभारतेय केंद्र

Tata Motors Vehicle Scrapping Facility : पर्यावरणासाठी टाटाने वेईकल्सची स्‍क्रॅपिंग सेंटर उभारण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tata Motors Vehicle Scrappage Center:

टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने भुवनेश्‍वर, ओडिशा येथे त्‍यांच्‍या दुसऱ्या रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्‍हीएसएफ) च्‍या उद्घाटनासह शाश्‍वत गतीशीलतेप्रती आपली कटिबद्धता कायम राखली आहे.

'Re.Wi.Re - रिसायकल विथ रिस्‍पेक्‍ट' नाव असलेल्‍या या प्रगत केंद्राचे उद्घाटन माननीय जल संसाधन, वाणिज्‍य व परिवहन मंत्री, ओडिशा सरकार श्रीमती तुकुनी साहू यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

ओडिशा सरकार (Government) व टाटा मोटर्सचे (Tata Motors) प्रतिनिधी यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या अत्‍याधुनिक केंद्रामध्‍ये पर्यावरणदृष्‍ट्या अनुकूल प्रक्रियांचा वापर केला जातो. या केंद्राची दरवर्षाला १०,००० एण्‍ड-ऑफ-लाइफ वेईकल्‍स सुरक्षितपणे व शाश्‍वतपणे विघटन करण्‍याची क्षमता आहे.

सर्व ब्रॅण्‍ड्सच्‍या एण्‍ड-ऑफ-लाइफ पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍स स्‍क्रॅप करण्‍यासाठी टाटा मोटर्सची सहयोगी एम्प्रिओ प्रिमिअमने आरव्‍हीएसएफ विकसित केले असून कार्यसंचालन देखील पाहतात. जयपूर, राजस्‍थन येथे पहिल्‍या केंद्राला यश मिळाल्यानंतर हे दुसरे केंद्र लाँच करण्‍यात आले आहे आणि कंपनीच्‍या शाश्‍वत उपक्रमांसाठी आणखी एक मोठे पाऊल आहे.

ओडिशामध्‍ये टाटा मोटर्सच्‍या Re.Wi.Re आरव्‍हीएसएफच्‍या लाँचबाबत आपले मत व्यक्त करत माननीय जल संसाधन, वाणिज्‍य व परिवहन मंत्री, ओडिशा सरकार श्रीमती तुकुनी साहू म्‍हणाल्‍या, ''आजचा दिवस ओडिशामधील (Odisha) शाश्‍वत विकासाच्‍या दिशेने आमच्‍या प्रयत्‍नांमधील मोठा टप्‍पा आहे.

नवीन स्‍क्रॅपेज केंद्राच्‍या उद्घाटनासह आम्‍ही आमच्‍या परिवहन विभागाचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्‍याच्‍या दिशेने महत्त्‍वाचे पाऊल उचलत आहोत. हे केंद्र जुन्‍या वेईकल्‍सच्‍या विघटनासाठी सोईस्‍कर व सुरक्षित मार्ग देण्‍यासह परिवहनाच्‍या शुद्ध व अधिक कार्यक्षम मोड्सच्‍या अवलंबतेला चालना देखील देते. आम्‍ही हा प्रकल्‍प प्रत्‍यक्षात आणण्‍यामध्‍ये सामील असलेले टाटा मोटर्स आणि सर्व पार्टींच्‍या कटिबद्धतेचे कौतुक करतो. तसेच आम्‍ही नागरिकांना शुद्ध व हरित भविष्‍य निर्माण करण्‍याच्‍या आमच्‍या प्रयत्‍नामध्‍ये सामील होण्‍याचे आवाहन करतो.''

या लाँचबाबत आपले मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या ट्रक्‍सचे व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, ''टाटा मोटर्समध्‍ये आम्‍ही पर्यावरणास अनुकूल गतीशीलता सोल्यूशन्स आणि परिपूर्ण लाइफसायकल व्‍यवस्‍थापनाला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.

ओडिशामध्‍ये आमच्‍या नवीन आरव्‍हीएसएफचे उद्घाटन करत असताना राज्‍यामध्‍ये जबाबदार एण्‍ड-ऑफ-लाइफ वेईकल स्‍क्रॅपिंगप्रती परिवर्तनात्‍मक प्रवास सुरू करत आहोत. सुरक्षित व शाश्‍वत वेईकल स्‍क्रॅपिंगसाठी आधुनिक उपकरण असलेल्‍या जागतिक स्‍तरावरील बेंचमार्क रिसायकलिंग प्रक्रियांची अंमलबजावणी करत आमचा उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी स्‍क्रॅप मटेरिअल्‍समधून मूल्‍य प्राप्‍त करण्याचा आणि अपव्‍यय कमी करण्याचा मनसुबा आहे. आम्‍ही या प्रकल्‍पाला प्रत्‍यक्षात आणण्‍यासाठी ओडिशा सरकारच्‍या असाधारण प्रयत्‍नांचे कौतुक करतो. या विकेंद्रीकृत केंद्रांचा ग्राहकांना फायदा होईल, आर्थिक विकासाला चालना मिळेल, रोजगार संधी निर्माण होतील आणि पर्यावरणास अनुकूल वेईकल स्‍क्रॅपिंगच्‍या गरजेची पूर्तता होईल.''

अत्‍याधुनिक केंद्र Re.Wi.Re. हे सर्व ब्रॅण्‍ड्सच्‍या एण्‍ड-ऑफ-लाइफ पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सचे विघटन करण्‍याच्‍या उद्देशाने निर्माण करण्‍यात आले आहे, जेथे पर्यावरणदृष्ट्या (Environment) अनुकूल पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. पूर्णत: डिजिटल सुविधेसह सर्व कार्यसंचालने एकसंधी व पेपरलेस आहेत. तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, ऑईल्‍स, लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्‍या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्टेशन्स आहेत.

प्रत्‍येक वेईकल विशेषत: पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन केलेल्‍या प्रखर डॉक्‍यूमेन्‍टेशन व विघटन प्रक्रियेमधून जातात. असे करत विघटन प्रक्रियेमधून बारकाईने लक्ष दिल्‍याची, तसेच सर्व घटकांच्‍या सुरक्षित विघटनाची खात्री मिळते. Re.Wi.Re. केंद्र ऑटोमोटिव्ह उद्योगातील शाश्वत पद्धतींना चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण झेप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT