टाटा मोटर्स कंपनीने बजेटच्या दिवशी मोठा धमाका केला आहे. गेल्या महिन्यात टाटा मोटर्सने चौथी इलेक्ट्रिक कार Tata Punch EV बाजारात आणली होती. त्यानंतर आता कंपनी सीएनजी, पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहे. (Latest Marathi News)
कंपनीने ऑटो एक्सपोदरम्यान CURVV कार लाँच केली होती. त्यानंतर या कारचं इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याची योजना आखली आहे. टाटा मोटर्सने याबाबत स्पष्ट केलं आहे की, इंटर्नल कम्बशन इंजिन हे १.५ लिटर क्षमतेचं ४ सिलिंडर डिझेल इंजिन कारमध्ये असणार आहे. एसयूव्ही डिझेल इंजिनसोबत चांगलं मायलेज देखील मिळणार आहे. ही कार तुमच्या खिशाचं बजेट सांभाळण्याचं काम देखील करेल.
१.५ लिटरचं डिझेल इंजिनचा NEXON फेसलिफ्टमध्ये वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे 125bhp पॉवर आणि 225Nm टॉर्क जनरेट होणार आहे. इंजिनला ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स जोडले आहेत. Tata Curvv च्या या कारला इंजिनला थोडं ट्यून करण्यात आलं आहे. त्यात मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि DCT ट्रान्समिशन असणार आहे.
टाटा Curvv कारची लांबी ४,३००८ मिमी आहे. तर रुंदी १,८१० मिमी आहे. उंची ही १६३० मिमी आहे. तसेच २,५६० मिमीचा व्हीलबेस देखील आहे. कंपनीचा दावा आहे की, कारमध्ये ४२२ लिटर बूट स्पेस आहे.
TATA Curvv कंपनीच्या या मॉडेलमध्ये व्हायरलेस ऑटो,अॅप्पल कारप्ले, १०.२५ इंच टचस्क्रिन इन्फोटेनमेंट स्क्रिन, १०.२५ इंच डिजिटल ड्रायव्हर डिसप्ले, मोठा पॅनोरमिक सनरुफ, 2-स्पोक स्टीअरिंग व्हील, वायरलेस चार्जिंग पॅड, वेंटिलेटेड सीट, एयर प्यूरिफायर आणि प्रीमियम ऑडियो सिस्टम या सारख्या सुविधा मिळणार आहे. कंपनी या कारचं प्रॉडक्शन आगामी एप्रिल महिन्यात करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.