Swapna Shastra amar ujla
लाईफस्टाईल

Swapna Shastra: स्वप्नात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड आणि माजी प्रियकर-प्रेयसीला पाहिलं तर? काय असतो अर्थ?

Swapna Shastra: रात्री झोपताना प्रियकर आणि माजी प्रियकर-प्रेयसीचे दर्शन अनेक खास गोष्टींचे संकेत देत असतं. जाणून घेऊया कोणत्या परिस्थितीत प्रियकर किंवा प्रेयसीचे दर्शन होणे शुभ किंवा अशुभ मानले जाते?

Bharat Jadhav

प्रत्येक व्यक्तीला झोपताना वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने दिसतात. यात काही स्वप्ने भविष्यात तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार असल्याचे सूचित करतात. तर काही स्वप्न काही वाईट गोष्टी घडणार असल्याचं सुचित करत असतात. तुमच्या स्वप्नात तुम्ही किंवा इतर व्यक्ती हसताना, रडतांना, भांडतांना दिसत असतात. स्वप्नात सा, देव, गाय, दिसली तर त्याचे संकेत काय हे पाहून जाणून आहोत. पण समजा स्वप्नात तुम्हाला तुमची प्रेयसी दिसली किंवा तुमचा प्रियकर दिसला तर त्याचा शुभ परिणाम होतात का अशुभ परिणाम होतात ते जाणून घेऊ.

स्वप्नात प्रियकराला पाहणं

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात जर तुम्ही स्वत:ला तुमच्या प्रियकराशी भांडताना पाहत असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खुश नाही, हे यातून स्पष्ट होते. यामुळे तुमच्या नात्याबद्दल तुम्हाला शंका आहे. तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलून तुमच्या दोघांमधील मतभेद दूर करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या स्वप्नात हसताना किंवा चुंबन घेताना पाहिले तर ते एक चांगले संकेत आहेत. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या दोघांमध्ये प्रणय वाढेल. काळानुसार नाते घट्ट होईल.

स्वप्नात आधीच्या प्रियकर पाहण्याचा अर्थ काय

जर तुम्हाला तुमचा आधीचा प्रियकर तुमच्या स्वप्नात दिसला तर हे तुम्ही त्याला अजूनही विसरला नाहीत, हे संकेत यातून मिळत असते. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण तुम्हाला आठवत असतात. स्वप्नात जर तुम्ही तुमचा आधीचा प्रियकर उदास असलेला पाहिला तर तुम्ही त्याच्याबद्दल काळजीत आहात. जर तुम्ही त्यांची फसवणूक केली असेल तर त्याबद्दल तुमच्या मनात अपराधीपणा वाटतोय असं संकेत यातून मिळत असतात.

कुठेतरी त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवतात. दुसरीकडे, जर तुम्ही तुमचा आधीचा प्रियकर तुमच्या स्वप्नात उदास दिसत असेल तर हे लक्षण आहे की तुम्ही त्याच्याबद्दल काळजीत आहात. जर तुम्ही त्यांची फसवणूक केली असेल तर त्याबद्दल तुमच्या मनात अजूनही अपराधीपणा आहे.

आधीच्या प्रेयसीला स्वप्नात पाहणं

जर तुम्ही तुमच्या स्वप्नात आधीच्या प्रेयसीला पाहिलं असेल तर समजा तुम्ही तिला अजून विसरला नाहीत. तुम्ही तुमचं नातं लवकर संपवलं असल्याची भावना तुमच्या मनात येत असते.

प्रेयसीला स्वप्नात पाहणं काय होतो अर्थ

जर तुम्ही तुमच्या प्रेयसीला स्वप्नात हसताना पाहिलं तर तुमच्या प्रेम जीवनात आनंदही आनंद येणार असल्याचं संकेत मिळत असतात. जर तुमच्या दोघांमध्ये काही वाद असेल तर तोही मिटेल. जर प्रेयसी तुमच्या स्वप्नात रडतांना दिसली तर हे अशुभ संकेत असतात. या स्वप्नांचा अर्थ तुमची प्रेयसी कोणत्या तरी गोष्टीवरुन नाराज असते. जर स्वप्नात तुमची प्रेयसी लाल रंगाच्या कपड्यात दिसली तर तुमचं प्रेम अजून वाढेल आणि तुमचं नातं मजबूत होईल, असं संकेत या स्वप्नातून मिळत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT