Surya Gochar 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Surya Gochar 2023 : सूर्य-मंगळाची अपार कृपा! येत्या 2 दिवसात पलटणार या लोकांचे भाग्य, आरोग्याची काळजी घ्या

Surya Gochar In Mangal Yuti : सूर्याच्या राशी परिवर्तानामुळे मोठा बदल होणार आहे. तसेच ग्रहांचा सेनापती मंगळ आधीच सिंह राशीमध्ये आहे.

कोमल दामुद्रे

Surya Mangal Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे संक्रमण होणार आहे. १ वर्षानंतर सूर्य सिंह राशीत अर्थात स्वराशीत प्रवेश करेल. सूर्याच्या राशी परिवर्तानामुळे मोठा बदल होणार आहे. तसेच ग्रहांचा सेनापती मंगळ आधीच सिंह राशीमध्ये आहे.

याच्या संक्रमणामुळे मंगळ व सूर्याचा संयोग देखील तयार होत आहे. १७ ऑगस्टला सूर्याचे संक्रमण होणार आहे. सिंह राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा संयोग सर्व राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पाडेल. परंतु 3 राशीच्या लोकांसाठी, मंगळ आणि सूर्याच्या संयोगामुळे अचानक आर्थिक लाभ होईल. या लोकांच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी वाढेल.

1. सिंह :

सिंह राशीत सूर्याच्या संक्रमणामुळे निर्माण झालेली ही युती या राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळवून देऊ शकते. या लोकांना अचानक कुठूनही पैसा (Money) मिळू शकतो. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमची सक्रियता वाढेल आणि तुम्ही मजबूत नेटवर्क तयार कराल. वाणीच्या बळावर काम कराल.

2. वृश्चिक :

वृश्चिक राशीच्या लोकांना सूर्य आणि मंगळाचा संयोग शुभ परिणाम देईल. या लोकांचे उत्पन्न वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. यासोबतच उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. व्यावसायिकांचा नफा वाढेल. व्यवसायाचा विस्तार होईल. जोखमीच्या गुंतवणुकीमुळे (Investmet) अनेकांना चांगला परतावाही मिळू शकतो. तुमची कोणतीही महत्त्वाची योजना यशस्वी झाल्यास तुम्ही आनंदी व्हाल. मुलांकडून आनंद मिळेल.

3. मकर:

सूर्य आणि मंगळाच्या संयोगाने मकर राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम मिळेल. या लोकांना त्यांच्या कामात नशिबाची साथ मिळेल, त्यामुळे काम जलद होईल. तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. धार्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवास करण्याची शक्यता अधिक आहे. प्रवास (Travel) लाभदायक ठरू शकतो. तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि परीक्षेत यश मिळू शकेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: एका तालुक्यातून 50 हजार गाड्या; या दिवशी भगवं वादळ मुंबईला धडकणार, मनोज जरांगेंनी दिला इशारा|VIDEO

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचा अकाली मृत्यू; मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Politics: भाजप प्रवक्त्या मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश, आरती साठेंच्या नेमणुकीवर पवारांचा गंभीर आरोप

Onion : चाळीत ठेवलेला ७०० क्विंटल कांदा जाळला; सात लाख रुपयांचे नुकसान, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध स्थानिकांचे आणि माजी नगरसेवकांचे साखळी उपोषण

SCROLL FOR NEXT