Surya Gochar 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Gochar 2024 : १८ वर्षांनंतर सूर्य-राहूची मीन राशीत युती! या ५ राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणारे, मिळेल बक्कळ पैसा

Surya Gochar Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार १४ मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच ग्रहांचे संक्रमण विशिष्ट वेळेनुसार होत असते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि गुरु याचे संबंध अधिक चांगले मानले जातात.

कोमल दामुद्रे

Surya Gochar In Meen Rashi 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार १४ मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच ग्रहांचे संक्रमण विशिष्ट वेळेनुसार होत असते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि गुरु याचे संबंध अधिक चांगले मानले जातात.

तब्बल १८ वर्षानंतर मीन राशीत सूर्य आणि राहूचा संयोग होणार आहे. हा संयोग अनेक राशींना फायदा मिळवून देईल. गुरुच्या राशीत या दोन्ही ग्रहांचे संक्रमण झाल्याने गजकेसरी योग तयार होत आहे. जाणून घेऊया मीन संक्रांतीचा ५ राशींना (Rashi) फायदा होईल. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. वृषभ

मीन संक्रांती वृषभ लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला मोठे यश मिळेल. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्येही वाढ होईल. रखडलेले पैसे (Money) मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत (Job) बढती आणि मान सन्मान वाढेल. नवीन जोडप्यांच्या आयुष्यात आनंद येईल.

2. मिथुन

या संक्रमणामुळे तणावापासून मुक्ती मिळेल. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या कमी होतील. कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. कामाच्या बाबतीत घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद असेल.

3. तुळ

तुळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण आनंद घेऊन येईल. बनवलेली रणनीती प्रभावी ठरेल. कायदेशीर बाबींमध्ये घेतलेला निर्णय तुमच्या बाजूने असेल. कोणालाही कर्ज देऊ नका, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. बाहेर जाण्याचा प्लान कराल.

4. वृश्चिक

सूर्याच्या संक्रमणामुळे ही व्यक्ती अतिशय बुद्धिमान आणि उत्साही राहिल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. अभ्यासाकडे अधिक लक्ष द्याल. कामात मोठे यश मिळेल.

5. मकर

संक्रमणाच्या काळात तुम्ही जे काही काम सुरु कराल त्यात यश मिळेल. कामाच्या अनेक चांगल्या संधीही मिळतील. कौशल्य आणि नेतृत्वाच्या बळावर तुम्ही कठीण परिस्थितीत विजय मिळवू शकाल. धार्मिक कार्यात अधिक रस वाढेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT