Supreme Court Saam TV
लाईफस्टाईल

Supreme Court Jobs: दहावी पास झालेला गडी थेट सुप्रीम कोर्टात करणार नोकरी, 'या' पदासाठी होणार भरती

Supreme Court Jobs: सर्वोच्च न्यायालयात 10वी उत्तीर्णांसाठी नोकरी करण्याची संधी चालू आलीय. कनिष्ठ न्यायालय परिचर पदासाठी भरती केली जाणार आहे. ही जागा स्वयंपाकाच्या कामासाठी आहे. ज्या उमेदवारांना स्वयंपाक कसा करावा हे माहित आहे ते यासाठी अर्ज करू शकतात.

Bharat Jadhav

सुप्रीम कोर्टात नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सुप्रीम कोर्टात ज्युनियर कोर्ट अटेंडंटच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.आता तुम्ही विचारात असला सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी तर या पदासाठी उच्च शिक्षणाची गरज असेन. परंतु या नोकरीसाठी उमेदवार फक्त १०वी पास असला पाहिजे. दहावी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या sci.gov.in या वेबसाइटला भेट देऊन यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी 23 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2024 असणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सर्वोच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायालय परिचर पदाच्या 80 रिक्त पदांवर भरती होणार आहे. ही जागा स्वयंपाकाच्या कामासाठी आहे. ज्या उमेदवारांना स्वयंपाक कसा करावा हे माहित आहे ते यासाठी अर्ज करू शकतात.

कनिष्ठ न्यायालय परिचर पदासाठी शैक्षणिक पात्रता

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा. तसेच, एखाद्याने स्वयंपाक किंवा पाककला या विषयात किमान एक वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा. त्याशिवाय नामांकित हॉटेल/रेस्टॉरंट/सरकारी विभाग किंवा PSU मध्ये किमान तीन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. या भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे आहे.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. 1 ऑगस्ट 2024 पासून वयाची गणना केली जाईल. ज्युनिअर कोर्ट अटेंडंट या पदासाठी लेखी परीक्षा होईल. ज्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. हा पेपर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल. तसेच प्रात्यक्षिक ट्रेड स्किल टेस्ट आणि मुलाखतही होणार आहे.

लेखी परीक्षा 100 गुणांची असेल. ज्यामध्ये ३० गुणांचे सामान्य ज्ञान आणि ७० गुणांचे कुकिंग संबंधित प्रश्न असतील. तर प्रॅक्टिकल ट्रेड स्किल टेस्ट 70 गुणांची असेल आणि मुलाखत 30 गुणांची असेल. तर परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 400 रुपये आहे. तर SC, ST आणि दिव्यांगांसाठी अर्ज शुल्क 200 रुपये असेल. उमेदवारांना स्तर-3 नुसार वेतन दिले जाईल. उमेदवारांना दरमहा 21700 ते 46210 रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT