Skin Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, पिंपल्स आणि रिंकल्सच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका

Skin Care Routine In Summer Season : उन्हाच्या किरणांमुळे किंवा घामामुळे चेहऱ्याची चमक गमवावी लागते. अशावेळी महागड्या पार्लर किंवा केमिकल उत्पादनाचा वापर न करता तुम्ही घरगुती उपचार करु शकता.

कोमल दामुद्रे

Summer Skin Care Tips :

ग्लोइंग, तुकतुकीत त्वचा कुणाला नको असते. चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहाते ते त्यांची व्यवस्थित काळजी घेतल्याने. उन्हाळा आला की, आपल्याला सर्वात जास्त टॅनिंगचा सामना करावा लागतो.

उन्हाच्या किरणांमुळे किंवा घामामुळे चेहऱ्याची चमक गमवावी लागते. अशावेळी महागड्या पार्लर किंवा केमिकल उत्पादनाचा वापर न करता तुम्ही घरगुती उपचार करु शकता. घरच्या काही स्किन (Skin) केअर टीप्सचा (Tips) अवलंब करुन तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्स (Pimples), फोड आणि सुरकुत्यांपासून त्वचेचे संरक्षण करु शकता.

1. चेहरा धुताना काळजी घ्या

उन्हाळ्यात आपल्याला दिवसातून किमान दोनदा चेहरा धुता यायला हवा. यासाठी तुम्हाला तुमची स्कीन कोणत्या प्रकारची आहे हे पाहायला हवे. त्यानुसार फेस वॉश निवडा.

2. सनस्क्रीन

सनस्क्रीन ही प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेसाठी वापरायला हवी. उन्हाळ्यात याची अधिक गरज असते. ही सनस्क्रीन कडक उन्हापासून तुमचे रक्षण करत नाही तर प्रदूषण आणि इतर गोष्टींपासूनही तुमचे रक्षण करते.

3. एक्सफोलिएट

उन्हाळ्यात त्वचा अधिक तजेलदार दिसण्यासाठी सतत एक्सफोलिएट करणे देखील गरजेचे आहे. यासाठी तुमच्या त्वचेनुसार स्क्रब निवडा. स्क्रब विकत घेताना तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात ठेवा. जर तुम्हाला पिंपल्सच्या समस्या असतील तर कडुनिंबाचा स्क्रब फायदेशीर ठरेल.

4. पाणी प्या

उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येपासून दूर राहा. यासाठी दिवसातून किमान ४ ते ५ लिटर पाणी प्यावे. यामुळे तुमची त्वचा अधिक सुधारेल तसेच पिंपल्सच्या समस्येपासून दूर राहाल.

5. झोपण्यापूर्वी हे काम करा

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवा. यानंतर चेहरा आणि मानेवर मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा दुरुस्त होण्यास मदत होईल. तसेच चेहऱ्यावर नाईट क्रीम देखील लावणे महत्त्वाचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati: १३ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी अटक, आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या, बारामतीत खळबळ

Maharashtra News Live Update: उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

Heatstroke Treatment: खिशात कांदा ठेवून उन्हात फिरलात तर उष्माघाताचा त्रास होत नाही? वैज्ञानिकदृष्ट्या नेमकं काय खरं?

Short Kurta Design: २५० ते ३०० रुपयांत खरेदी करा हे ट्रेंडी शॉर्ट कुर्ते; ऑफिस किंवा आऊटिंगसाठी मिळेल परफेक्ट लूक

कडक उन्हाचा फटका, पोहायला गेले, पुन्हा परतलेच नाही; २ जिवलग मित्रांसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT