Butter Milk Benefits In Summer Season
Butter Milk Benefits In Summer Season Saam Tv
लाईफस्टाईल

Butter Milk Benefits In Summer Season: रखरखत्या उन्हापासून सुटका हवीये ? नियमित करा ताकाचे सेवन, जाणून घ्या फायदे

कोमल दामुद्रे

Healthy Drinks : उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा खूप त्रास होतो. त्यामुळे लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल होतात. खाण्यापिण्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्वच गोष्टीत बदलतात. उष्णतेपासून बाचव करण्यासाठी लोक प्रयत्न करत असतात.

उन्हाळ्यात आरोग्य (Health) निरोगी राहण्यासाठी शरीराला डिहायड्रेट होण्यापासून वाचवणे गरजेचे असते. त्यामुळे उन्हाळ्यात लोक हायड्रेट राहण्यासाठी किंवा उन्हापासून आराम मिळवण्याकरिता शीतपेय, ताक पितात.

तसेच शीतपेय कधीकधी आपल्यासाठी हनिकारक असू शकतात. अशा वेळेस केवळ ताक पिणे आपल्यासाठी खूप फायदेशीर (Benefits) आहे. म्हणून उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी ताक प्यायल्यास अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया फायदे काय आहेत.

1. लठ्ठपणा कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी ताक पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. रोज नियमितपणे ताक प्यायल्यास तुम्हाला परिणाम जाणवेल. ताकामध्ये कॅलरीज आणि फॅटचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे ताक प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. म्हणून उन्हाळ्यात इतर शीतपेयचे सेवन करण्यापेक्षा ताक पिने फायदेशीर ठरते.

2. पोटासाठी फायदेशीर

अनेकांना उन्हाळ्यामध्ये पचनाच्या समस्या उद्भवतात. तसेच पोटदुखी, पोटात जळजळ किंवा पोट खराब होणे या समस्यांचा त्रास खूप वाढतो. त्यामुळे पोटांच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही ताकामध्ये काळे मीठ आणि पुदिना मिसळून पिऊ शकता.

3. त्वचेसाठी फायदेशीर

कॅल्शियम, व्हिटॅमिन (Vitamins) बी, व्हिटॅमिन ए, प्रथिने यासारख्या गुणधर्मांनी ताक परिपूर्ण असते. त्यामुळे तुमची त्वचा (Skin) निरोगी ठेवण्यासाठी ताक पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. रोज केवळ एक ग्लास ताक प्यायल्यास तुमची त्वचा निरोगी राहते.

4.ऍसिडिटीसाठी उपयुक्त

उन्हाळ्यात तेलयुक्त आणि मसालेदार अन्नपदार्थ खाल्ल्याने पचनशक्ती बिघडते. परिणाम ऍसिडिटीच्या समस्या उद्भवतात. ऍसिडिटीमुळे जळजळ होण्याच्या तक्रारी अधिक प्रमाणात वाढतात त्यामुळे या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही रोज ताक पिऊ शकता.

5. डिहायड्रेशनपासून बचाव

पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात डीहायड्रेशनच्या समस्या उन्हाळ्यात अधिक प्रमाणात उद्भवतात. त्यामुळे डीहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी तुम्ही ताकचे सेवन करू शकता. ताकामध्ये साखर, पुदिना टाकून प्यायल्याने डिहायड्रेशन आणि डायरिया या समस्यांपासून आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : जेपी गावित माघार घेणार की निवडणूक लढवणार? उद्या होणार निर्णय

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

Perfume Hacks: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Student Aadhar Card Update : २ लाख ७४ हजार ४३१ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक चुकीचे

Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणखी एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार, दिग्गज स्टारकास्टसोबत करणार स्क्रिन शेअर

SCROLL FOR NEXT