Drinking Water Advice google
लाईफस्टाईल

Drinking Water Advice: कडक उन्हातून घरी गेल्यावर लगेच घटाघट पाणी पिताय? सावधान! या ४ गोष्टी आताच टाळा, अन्यथा...

Dehydration Prevention: तुम्हालाही उन्हातून घरी गेल्यावर खूप पाणी प्यावसं वाटत असेल तर थांबा. पुढील महत्वाची माहिती वाचा.

Sakshi Sunil Jadhav

सध्या महाराष्ट्रातल्या अनेक भागात उकाडा सुरुच आहे. या दिवसांमध्ये नागरिकांना खूप काळजी घेऊनच बाहेर पडावं लागतं. लोक छत्री, स्कार्फचा वापर घराबाहेर फिरताना करतात. पण ही शरीराच्या बाहेरची काळजी आहे. असं आपण म्हणू शकतो. पण उन्हाळ्यात येणारा प्रचंड घाम तुमच्या शरीरातलं पाणी कमी करतो.

शरीरातलं पाणी कमी होणं म्हणजेच डिहायड्रेशनचा त्रास. म्हणूनच लोक जास्त पाणी पिणं पसंत करतात. पाण्याने अनेक समस्या दूरही होत असतील. पण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायलात तर तुमचं नुकसान होऊ शकतं. ही सामान्य वाटणारी समस्या नाही. याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

थंड पाणी पिणे

उन्हाळा आहे म्हटल्यावर सगळ्यांनाच थंड पाणी प्यायला आवडतं. पण तुम्ही घरी पोहोचल्या पोहोचल्या ढसाढसा थंड पाणी पित असाल तर तुम्हाला त्याने तहान भागल्या सारखं वाटणार नाही. फक्त काही सेकंदासाठी तोंडात थंडावा जाणवेल. पण थंड पाण्याने पचनसंस्था बिघडते. थंड पाणी नॉर्मल होण्यासाठी खूप कालावधी लागतो आणि शरीराला त्यासाठी खूप जास्त एनर्जी लावाली लागते.

कोल्ड ड्रिंक्स पिणे

उन्हाळ्यात आपण सवयी प्रमाणे एखाद्या थंड्याची बाटली घेऊन जातो. याने काहीवेळासाठी थंडावा जाणवतो. तहान भागते पण ती तात्पुरतीच. तर याने तुमची पचनक्रिया मंदावते आणि शरीरातल्या टॉक्सिंन्सचं प्रमाण वाढतं. याने तुम्हाला डिहायड्रेशनच्याही समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

हे उपाय करा

तुम्ही उन्हाळ्यात नारळाचे पाणी, सत्तू ड्रिंक, गुलकांदाचा सरबत, ताक, लिंबू पाणी, माठातले पाणी हे पेय तुम्ही उन्हाळ्यात सेवन करू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस

Rain Alert : पावसाचं रौद्ररूप! मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mumbai House Collapse: क्षणात भयंकर घडलं! मानखुर्दमध्ये ३ मजली घर कोसळलं, ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Nashik Waterfalls : नाशिकच्या दऱ्याखोऱ्यांत कोसळणारे ५ धबधबे, निसर्गाच्या अद्भुत सौंदर्यात हरवून जाल

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली शस्त्रक्रिया; 'या' गंभीर आजाराशी देत होती लढा, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT