बदलेल्या जीवनशैलीमुळे फॅशन देखील बदलत चालली आहे. सध्याची फॅशन आणि पूर्वीच्या फॅशनमध्ये पाहायला गेले तर खूप अंतर आहे. हल्ली सुंदर दिसण्यासाठी, चार चौघात उठून दिसण्यासाठी लोकं अनेक वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतात.
सुंदर दिसण्यासाठी आपण जितके महत्त्व चेहऱ्याला देतो तितकेच महत्त्व आपण आपल्या पायांना देखील द्यायला हवे. त्यामुळे आपला फॅशन (Fashion) सेन्स उठून दिसतो. जर तुम्हाला फुटवेअरमध्येही ब्युटीफुल लूक तयार करू शकता. तसेच ड्रेससोबत उन्हाळ्यात (Summer season) कोणते फुटवेअर घालायला हवे जाणून घेऊया.
1. क्लॉग्स
क्लॉग्स हे फुटवेअर स्वीडिश आणि जपान देशातून आले असून भारतात फॅशन स्टेटमेंट बनले आहे. उन्हाळ्यात हे फुटवेअर वापरण्यासाठी अतिशय आरामदायी पर्याय मानले जाते. हे तुम्ही जीन्स, लूज टी-शर्टसोबत कॅरी करू शकता.
2. कोल्हापुरी चप्पल
कोल्हापुरी चप्पलमुळे पायाला कोणतीही ऍलर्जी होत नाही. ही खूप मऊ आणि गुळगुळीत असते. हे तुम्ही कुर्ती किंवा ड्रेसवर कॅरी करु शकता.
3. म्यूल्स
उन्हाळ्यात तुम्ही म्यूल्स फुटवेअर वापरु शकता. महिलांसोबतच पुरुषांचीही याला पसंती ठरत आहे. हे फुटवेअर घालायला सोपे आणि चालायला आरामदायी आहे. कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्हीवर वेअर करु शकता.
4. लेदर चप्पल
लेदर चप्पल उन्हाळ्यात खूप आरामदायी असतात. हे तुम्ही जीन्स, शॉर्ट्स आणि स्कर्टवर घालू शकता. लेदर सँडलमुळे तुमच्या एथनिक लुकवर भर पडेल.
5. एस्पॅड्रिल्स
कॅनव्हास, कापूस आणि लिनेनपासून बनवलेले एस्पॅड्रिल्स अतिशय सुंदर आणि डिझानर फुटवेअर पर्याय आहे. हे उन्हाळ्यात वेअर करण्यासाठी चांगला पर्याय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.