Summer Clothing Saam Tv
लाईफस्टाईल

Summer Clothing Ideas: गरमी पासून दिलासा देतात 'हे' 5 प्रकारचे समर फ्रेंडली फॅब्रिक्स

उन्हाळ्याचा सिझन येत आहे, बदलत्या ऋतुसोबत राहणीमान तसेच फॅशन, कपडे देखील बदलत असतात. जाणून घ्या काही समर फ्रेंडली कपड्यांविषयी जे तुम्ही उन्हाळ्यात परिधान केल्याने तुम्हाला गर्मी पासून दिलासा देतील सोबतच ट्रेंडी सुद्धा वाटतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Summer Clothing: सध्या फेब्रुवारी महिला सुरु आहे. या दिवसात दुपारी थोडा-थोडा उन्हाळा जाणवू लागला आहे. बदलत्या ऋतुसोबतच खाणे-पिणे, राहणीमान अश्या सर्व काही गोष्टी बदलतात. कपड्यांविषयी बोललं तर, कडकत्या उन्हात घाम, किचकिच पासून बचाव करण्यासाठी अश्या कपड्यांची गरज असते जे शरीराला आराम देतील आणि ते परिदहन केल्यावर कंफर्टेबल सुद्धा वाटेल. (Summer Clothing Ideas)

आता उन्हाळा तोंडावर आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला अश्या काही कपड्यांविषयी सांगणार आहोत जे तुम्ही परिधान करू शकता. (Summer Friendly Clothes)

Summer Clothes
Cotton

1) कॉटन (Cotton);

उन्हाळ्याचा ऋतू आहे आणि कॉटनच्या कपड्यांबद्दल बोललं न जाणं असे होऊच शकत नाही. कॉटन खूप हलके आणि आरामदायक असते. तसेच ते उन्हाळ्यात खूप छान दिसते. आजकाल बाजारात कॉटन पासून तयार केलेलं बरेच ड्रेसेस सहज मिळतात. मुला-मुलींसाठी अनेक स्टाईल आणि विविध फिकट रंगाचे आकर्षक कुर्ते मिळतात. तुम्हाला असे रेडिमेड कपडे मिळून जातील.

linens

2) लिनेन (linens);

वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी लिनेन देखील खूप उपयुक्त मानले जाते. लिनन हे सैल विणलेले कापड आहे, जे तुमच्या शरीराला खूप आराम देते. हे कापड उन्हाळ्यात येणारा घाम शोषून घेते. या फॅब्रिकमध्ये तुम्हाला पार्टीचे कपडे ते फॉर्मल आणि कॅज्युअल कपडे सहज मिळतील.

Chambray

3) चाम्बरे (Chambray);

चाम्बरे हे डेनिमसारखे दिसणारे अतिशय हलके फॅब्रिक आहे. हे कापड कापसापासून बनवले जाते. उन्हाळ्यात तरुण मुली आणि मुलांमध्ये डेनिमची खूप क्रेझ असते. अशा परिस्थितीत, आपण चाम्बरेपासून तयार केलेले ट्राउझर्स, शर्ट, जॅकेट, टॉप, शॉर्ट्स तुम्ही वापरू शकता.

Khadi Fabric

4) खादी (Khadi);

खादी केवळ आरामदायकच नाही तर हे तुम्हाला तुमच्या देशाच्या संस्कृतीशी जोडते. हे वर्षानुवर्षे लोकप्रिय आहे आणि आजही खूप ठिकाणी परिधान केले जाते. आजकाल अनेक ब्रँड्स खादीबाबतही अनेक प्रयोग करत असतात. तुम्हाला खादीमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश आणि सभ्य पोशाख पाहायला मिळतील.

Silk

5) सिल्क (Silk);

रेशीम सुद्धा असेच एक फॅब्रिक आहे जे वर्षानुवर्षेपासून लोकांच्या पसंतीस उतरले आहे आणि प्रत्येक ऋतूमध्ये परिधान करण्यास उत्तम पर्याय आहे. हे कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही. रेशीम उन्हाळ्याच्या दिवसात थंडपणा आणतो, तसेच तो तुम्हाला साजेसा लुकही देतो. तुम्ही ते कधीही आणि कुठेही सहज परिधान करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT