Summer Drink, Benefits Of Fennel Seeds Water  Saam Tv
लाईफस्टाईल

Summer Drink : उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! नियमित प्या बडीशेपचे पाणी; डिहायड्रेशनची समस्या होईल कमी

Benefits Of Fennel Seeds Water : आहारात लिंबूपाणी, शिकंजी सरबत, सत्तू, उसाचा रसचा समावेश करा. यामध्ये बडीशेपचे पाणीही शरीराला फायदेशीर ठरु शकते. याचा फायदा कसा होईल पाहूया

कोमल दामुद्रे

Fennel Seeds Water :

उन्हाळा सुरु झाला की, शरीराला अधिक गारव्याची गरज असते. मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपल्या पोटात आग किंवा जळजळ होते. अशावेळी आपण अनेक थंड पेयाचे सेवन करतो.

उन्हाळ्यात (Summer Season) डिहायड्रेशन, उष्माघात, डायरिया, टायफॉइड यांसारख्या समस्या खूप सामान्य असल्या तरी त्यांचा शरीरावर खूप गंभीर आणि दीर्घकाळ परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात (Care) विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना चेहरा स्कार्फने झाका, सनस्क्रीन लावा, पुरेशा प्रमाणात पाणी प्या तसेच शरीर थंड ठेवा. उन्हाळ्यात गरम आणि थंड पदार्थांच्या सेवनाने ताप, सर्दी आणि खोकला होऊ शकतो. त्यासाठी आहारात (Diet) लिंबूपाणी, शिकंजी सरबत, सत्तू, उसाचा रसचा समावेश करा. यामध्ये बडीशेपचे पाणीही शरीराला फायदेशीर ठरु शकते. याचा फायदा कसा होईल पाहूया

  • २ चमचे लिंबू, १/२ कप बडीशेप, ३ ते ४ पुदिन्याची पाने, चवीनुसार साखर, चवीनुसार काळे मीठ

  • बडीशेपचा ज्यूस बनवण्यासाठी बडीशेप धुवून दोन ते तीन तास पाण्यात भिजवा

  • त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. वरील सर्व साहित्य बारीक करुन त्याची पावडर तयार करा.

  • ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात पेस्ट घाला वरुन लिंबाचा रस घाला.

1. बडीशेपचे फायदे

  • बडीशेप शरीराला गारवा देते याचे पाणी प्यायल्याने शरीर थंड राहते.

  • यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्याने डिहायड्रेशनची समस्या देखील टाळता येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT